Viral: 'क्रूझ'वर काम करणाऱ्या पठ्ठ्याने खरेदी केली 10 लाखांची कार; पण पगारातील एक रुपयाही खर्च केला नाही

Viral News: प्रवीण जोशीळकर माथेरान येथील रहिवासी आहेत. त्याने मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि ॲप्लाइड न्यूट्रिशनमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Viral News: क्रूझ शिपवर काम करणे अनेक तरुणांसाठी आकर्षक असतं. कारण या क्षेत्रात चांगले वेतन मिळते आणि कामाचा अनुभव देखील चांगला असतो. एका मराठी तरुणामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. क्रूझ शिपवर काम करणाऱ्या एका मराठी तरुणाने जे करुन दाखवलं ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. प्रवीण जोशीळकर नावाच्या या तरुणाने क्रूझ शिपवरील परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या 'टिप्प्स'च्या पैशांतून तब्बल 10 लाख रुपयांची कार खरेदी केल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पोस्ट झाली व्हायरल

प्रवीण जोशीळकर याने इन्स्टाग्रामवर (Instagram) आपली नवीन कार आणि स्वतःचा फोटो शेअर करताना लिहिले की, "तुम्ही क्रूझ शिपवर काम करता, तेव्हा तुम्ही टिप्समधून सर्व काही खरेदी करू शकता."

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)

सोबतच त्याने बचत करण्याचा सल्ला देखील दिला. ज्यात त्याने सांगितलं की, पगार भविष्यातील बचतीसाठी असतो. म्हणजेच त्याने कार खरेदी करण्यासाठी पगारातील एकही रुपया खर्च केला नाही, तर केवळ प्रवाशांकडून मिळालेल्या टिप्समधून कार खरेदी केली. यासाठी युरोपीय आणि अमेरिकन प्रवाशांचे त्याने आभार मानले. 

Advertisement

कोण आहेत प्रवीण जोशीळकर?

प्रवीण जोशीळकर माथेरान येथील रहिवासी आहेत. त्याने मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि ॲप्लाइड न्यूट्रिशनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्या एका इटालियन क्रूझ कंपनीत बटलर म्हणून काम करत आहे. नोकरीसोबतच प्रवीण जोशीळकर आपल्या क्रूझ शिपवरील जीवनावर आधारित कंटेंट क्रिएट करतो.

सोशल मीडियावर प्रवीणचं अनेकजण कौतुक करत आहेत. अनेकांनी त्याचं अभिनंदन केले. काहींनी त्याला अशा नोकरीसाठी अर्ज कसा करायचा? अशी विचारणा देखील केली.

Advertisement

Topics mentioned in this article