50-60 रुपये डझनने विकली जाणारी केळी तुम्ही खाल्ली असेल. मात्र जर तुम्हाला सांगितलं की जगाच्या एका कोपऱ्यात अशीही केळं आहे जी 53 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे, तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत. मात्र तुम्हाला यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण असं प्रत्यक्षात घडलं आहे. न्यूयॉर्कमधील सोथबी येथील आर्ट गॅलरीत झालेल्या लिलावात भिंतीवर चिकटवलेली एक केळं तब्बल 53 कोटी रुपयांना (62 लाख डॉलर) विकली गेली आहे.
केळं विकत घेणारी व्यक्ती देखील कुणी सामन्य नव्हती. चीनमधीमधील क्रिप्टो उद्योगपती जस्टीन सन यांनी लिलावात ही केळी विकत घेतली आहे. सन यांनी हे केळं विकत घेत स्टेजवरच खाल्लं. "खरंच ही केळी खूप छान आहे. केळी स्वादिष्ट आहे", असं सन उपस्थितांना सांगितलं.
लिलाव सुरु झाला त्यावेळी या केळीवर 8 लाख डॉलरची बोली लागली. अवघ्या काही मिनिटात ही बोली 15 लाख डॉलरवर पोहोचली. अखेर चीनमधील उद्योगपती जस्टिन सन यांनी बोली जिंकत 53 कोटींना हे केळं विकत घेतलं. सन यांनी म्हटलं की, ही साधारण केळी नाही. ही एका सांस्कृतिक घटनेचं प्रतिनिधित्व करते. जी कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी कम्युनिटीला एकमेकांशी जोडते.
पहिल्यांदा 2019 मध्ये लिलाव
इटालियन आर्टिस्ट मॉरिजियो कॅटेलन यांनी ही केळीची कलाकृती तयार केली होती. या केळीला कॉमेडियन असं नाव देण्यात आलं होतं. पहिल्यांदा 2019 मध्ये पॅरोटिन आर्ट गॅलरीमध्ये ही विकली गेली होती.
कोण आहेत जस्टिन सन?
जस्टिन सन बहे क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म ट्रॉनचे संस्थापक आहेत. सन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी क्रिप्टोला दिलेल्या समर्थनाचं कौतुक देखील केलं होतं. जस्टिन सन यांच्यावर गेल्या वर्षी गैरव्यवहार आणि फसवणुकीचे आरोप देखील करण्यात आले होते.