जाहिरात

Video : विमानाच्या केबिनमध्ये घुसले कबुतर... 'जा, जा...' करताना क्रू मेंबर्सची पळापळ

Pigeon Flies Into Us Delta Flight Cabin Video: उड्डाण करण्यापूर्वी प्रवासी आपापल्या सीटवर बसत असताना, एक कबुतर विमानाच्या केबिनमध्ये घुसले आणि इकडे-तिकडे उडू लागले.

Video : विमानाच्या केबिनमध्ये घुसले कबुतर... 'जा, जा...' करताना क्रू मेंबर्सची पळापळ
मुंबई:

Pigeon Flies Into Us Delta Flight Cabin Video: सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये  एक कबुतर अमेरिकेच्या एका व्यावसायिक विमानात घुसून इकडे-तिकडे उडताना दिसत आहे. ही विचित्र घटना डेल्टा एअरलाइन्सच्या (Delta Airlines) विमानात घडली, जिथे एक कबुतर अचानक केबिनमध्ये उडताना दिसले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विमानात कबुतर कसे घुसले? (Pigeon enters flight video)

हे विमान लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जात होते. उड्डाण करण्यापूर्वी प्रवासी आपापल्या सीटवर बसत असताना, एक कबुतर विमानाच्या केबिनमध्ये घुसले आणि इकडे-तिकडे उडू लागले. विमानात कबुतर शिरल्यानं प्रवासी आश्चर्यचकित आणि गोंधळलेले होऊन त्याला पाहात होते आणि क्रू मेंबर्स त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

काही प्रवासी या घटनेमुळे घाबरले, तर काही लोक हसत हसत मजा लुटताना दिसले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स करण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, 'आता कबूतरसुद्धा एअरलाइनने प्रवास करू लागले आहेत,' तर दुसऱ्यानं 'कदाचित त्याचे तिकीट कन्फर्म झाले नसेल,' अशी प्रतिक्रिया दिली. 

तो बोनेटवर लटकत होता आणि ड्रायव्हरनं कार पळवली, मुंबईचा धक्कादायक Video पाहून उडेल थरकाप

( नक्की वाचा :  तो बोनेटवर लटकत होता आणि ड्रायव्हरनं कार पळवली, मुंबईचा धक्कादायक Video पाहून उडेल थरकाप )

उड्डाणापूर्वी दिसला 'पाहुणा'

खूप प्रयत्नांनंतर क्रू मेंबर्स आणि ग्राउंड स्टाफने कबुतराला विमानातून बाहेर काढले आणि त्यानंतर विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळाली. सुदैवाने ही घटना (Shocking airline incident video) टेक-ऑफ करण्यापूर्वी घडली, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकली असती. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

या प्रकारच्या घटना सहसा खूप कमी घडतात, पण जेव्हा त्या घडतात, तेव्हा त्या सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. ही घटना केवळ विचित्रच नव्हती, तर विमान सुरक्षिततेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण करणारी होती अखेर एक कबूतर एअरपोर्ट सिक्युरिटीतून कसे निसटले आणि विमानाच्या आत कसे पोहोचले? हा प्रश्न या निमित्तानं विचारला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com