जाहिरात

तो बोनेटवर लटकत होता आणि ड्रायव्हरनं कार पळवली, मुंबईचा धक्कादायक Video पाहून उडेल थरकाप

Mumbai Car Video : मुंबईतील एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीाडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारच्या बोनेटवर लटकून मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे.

तो बोनेटवर लटकत होता आणि ड्रायव्हरनं कार पळवली, मुंबईचा धक्कादायक Video पाहून उडेल थरकाप
मुंबई:

Mumbai Car Video : मुंबईतील एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीाडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारच्या बोनेटवर लटकून मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे. ड्रायव्हरने कारचा वेग कमी  करण्याऐवजी तो आणखी वाढवला. हा व्हायरल व्हिडिओ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक अर्टिगा कार वेगाने हायवेवर धावत आहे. त्याच कारच्या बोनेटवर एक व्यक्ती लटकलेला आहे. तो स्वतःला कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. असे असूनही कारच्या आत बसलेला ड्रायव्हार वेग कमी करत नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी रात्री घडली. दोन कारच्या ड्रायव्हरमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून जोरदार वाद झाला होता. बघता बघता वादाचे रूपांतर भांडणात झाले. अर्टिगा कार चालवणाऱ्या चालकाने रागाच्या भरात समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या चालकाला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, जमिनीवर उभा असलेला तो व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी कसाबसा गाडीच्या बोनेटवर चढला.

जीव वाचवण्याचा प्रयत्न

अर्टिगा ड्रायव्हरचा राग इथेच थांबला नाही. त्यानेकार वेगाने पळवायला सुरुवात केली. पण बोनेटवर लटकलेला व्यक्ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत राहिला. हे हृदयद्रावक दृश्य एका बाईकस्वाराने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गाडीचा वेग सातत्याने वाढत आहे आणि बोनेटवर लटकलेला व्यक्ती फक्त स्वतःला कसाबसा सावरत आहे.

( नक्की वाचा : एक्सप्रेस-वे वर महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडले भाजपा नेते, CCTV मध्ये झालं सर्व रेकॉर्ड )
 

हा व्हिडिओ समोर येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अर्टिगा कार चालक भीमकुमार महतो विरोधात एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com