Kerala Digital Wedding Viral Video: सध्या डिजिटल पेमेंटचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीसाठी हल्ली लोक युपीआय पेमेंटचा मार्ग निवडतात. अगदी काही भिकारीही क्यआर कोडद्वारे पैसे गोळा करत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. असाच प्रकार आता केरळमधील एका लग्नात घडला आहे. मुलीच्या लग्नात पित्याने आहेर स्विकारण्यासाठी असा काही जुगाड लावला की वऱ्हाडी कोमात गेले. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ
लग्नसमारंभात बंद पाकिटातून आहेर देण्याचा किंवा थेट आहेराची यादी करणाऱ्याच्या हातात पैसे देतो. पण केरळमधील एका लग्नसोहळ्यात डिजिटल आहेराचा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. या लग्नात वधूच्या वडिलांनी पाहुण्यांकडून आहेर घेण्यासाठी चक्क आपल्या शर्टवर पेटीएम क्यूआर कोड लावला होता.
याचा अर्थ, आता आहेर देणेही 'स्कॅन अँड सेंड' झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल खुद्द पेटीएमनेही हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब अकाउंटवरून शेअर केला आहे.'कॅशलेस वेडिंग'ची चर्चा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वऱ्हाडीही हसतहसत वडिलांच्या बॅजवर लावलेला क्यूआर कोड स्कॅन ) करत आहेत आणि डिजिटल पद्धतीने आहेर देत आहेत.
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
लोकांनी या लग्नाला 'कॅशलेस वेडिंग आणि 'डिजिटल शादी 2.0' असे नाव दिले आहे. अनेक युजर्सनी हे झाली खरी डिजिटल इंडिया असं म्हटलं आहे. तर काहींनी आता पाकिट विसरून जा, फक्त फोन उचला आणि स्कॅन करा, अशी कमेंट केली आङे. या व्हिडिओला हजारो लाईक्स (Likes) आणि शेअर्स (Shares) मिळाले आहेत. वधूच्या वडिलांच्या कल्पकतेचे (Creativity) आणि विनोदी शैलीचे अनेक लोकांनी कौतुक केले आहे. काही युजर्सनी तर यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. "कमी शगुन पाठवणाऱ्यांसाठी ही सर्वात धोकादायक कल्पना आहे, असंही काही जणांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world