एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!

लग्नमंडपातील नवऱ्यामुलीच्या एण्ट्रीचा एक असा व्हिडीओ समोर आलाय, जो तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल. वेडिंग एण्ट्रीवर जेव्हा डीजेवाल्याने चुकीचे गाणं लावले तेव्हा नववधूची प्रतिक्रिया कशी होते ते पाहा...

जाहिरात
Read Time: 2 mins
डीजेवाल्याने चुकीचे गाणं वाजवल्याने नववधू भडकली!

Bride Wedding Entry Viral Video: बदलत्या लाइफस्टाइलनुसार तरुणींसाठी आता त्यांचा लग्नसोहळा हे एक ड्रीम प्रोजेक्टच ठरत आहे. लग्नसमारंभातील लेहंग्यापासून ते मेंदी-हळद, संगीत सोहळ्यापर्यंत तरुणी स्वतःच स्वतःसाठी हटके पोशाखाची निवड करतात. लग्नाच्या नियोजनामध्ये थोडासाही गोंधळ झाला तर त्या लगेचच संपूर्ण घर डोक्यावर घेतात. असे म्हटलं जातं की, लग्नामध्ये नवरामुलगा रागावला तर मोठी गोष्ट नाहीय, पण नवरीमुलगी मुळीच रागावता कामा नये. अन्यथा वऱ्हाड्यांच्या नाकीनऊ येऊ शकते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नववधूसाठी लग्नसमारंभातील तिची एण्ट्री देखील आता आयुष्यातील मोठा सोहळा ठरू लागलाय. यासाठी ती कित्येक दिवस तयारी करत असते. असाच एका नववधूच्या एण्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवऱ्यामुलीच्या एण्ट्री वेळेस डीजेवाल्याने चुकीचे गाणं वाजवलं तेव्हा तिची प्रतिक्रिया कशी होती ते पाहा. 

(नक्की वाचा: Bollywood News: ज्या हॉटेलमध्ये वडील होते वेटर, तेच विकत घेऊन सुपरस्टारने बाबांना दिलं गिफ्ट; नेटवर्थ ऐकून बसेल धक्का)

नवऱ्यामुलीच्या एण्ट्रीवरुन गोंधळ

पाहुण्यांनी भरलेल्या लग्नमंडपामध्ये जेव्हा हायफाय नवऱ्यामुलीने प्रवेश केला तेव्हा डीजेवाल्याने चुकीचे गाणं वाजवलं, यामुळे तिचा चेहरा पडला. हे गाणं नाहीय, असे ती सांगत होती. तरीही चुकीचेच गाणं सुरू होते. अखेर तिनं हाताने इशारा करत हे गाणं नाहीय, असे सांगितलं. नवऱ्यामुलीचा संतापलेला चेहरा पाहून मंडपामध्ये गोंधळ उडाला. या व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.   

Advertisement

लोकांनी नववधूला दिला पाठिंबा (Bride Wedding Entry Video)

नवरीच्या या व्हायरल व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिलंय की, 'दहा मिनिटे समजावल्यानंतरही त्याने हे मेल वर्जन गाणे बदलले नाही'. दुसऱ्याने लिहिलंय की,'नवरीने 'साथ छोडूंगा ना तेरे पीछे आऊंगा का' या गाण्याचे फीमेल वर्जन लावण्यास सांगितले होते'. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'बिचारीचा पूर्ण प्लान फसला'. तर एकाने गंमतीशी कमेंट करत म्हटलंय की, 'बरं झालं चुकीचे गाणं लावलं नाहीतर आम्ही इतकी क्युट रिअ‍ॅक्शन पाहू शकलो नसतो'.

(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)