Doctor Saves Life Of Patient: हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकाराच्या अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाल्या आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका डॉक्टरने क्षणाचाही विलंब न लावता एका रुग्णाचा जीव वाचवला. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. डॉक्टरच्या समयसूचकतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागते आणि तो खुर्चीवरून खाली पडणारच असतो, तेवढ्यात एक डॉक्टर धावत तिथे येतो. काहीही विचार न करता तो ताबडतोब त्या व्यक्तीला सीपीआर द्यायला सुरुवात करतो. डॉक्टरच्या या त्वरित आणि योग्य कृतीमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचतो. काही सेकंदातच तो शुद्धीवर येतो.
(नक्की वाचा- VIDEO : लिंबू चिरडताच गाडी पहिल्या मजल्यावरून खाली, नव्याकोऱ्या Thar चा चक्काचूर)
पाहा व्हिडीओ
जवळपास 22 सेकंदांचा हा व्हिडिओ एक मोठा धडा देतो. डॉक्टरच्या तत्परतेमुळे त्या रुग्णाला नवीन जीवन मिळाले आहे. याच कारणामुळे लोक या डॉक्टरची प्रशंसा करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर @hislove_and_herdiary या हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
(नक्की वाचा - Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या)
व्हिडीओला त्याला 7.5 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 50 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 300 हून अधिक युजर्सनी कमेंट्समध्ये डॉक्टरला सलाम केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'आपल्याला अशाच डॉक्टरांची गरज आहे,' तर दुसऱ्याने म्हटले, 'कमीतकमी त्याने दुसऱ्याची वाट पाहिली नाही.' एका भावुक युजरने तर 'हा डॉक्टर नाही, देव आहे' असे लिहिले आहे.