लग्न समारंभातीन डान्स परफॉर्मन्स नेहमीच चर्चेचा विषय असतात. एका लग्नात एका वृद्ध महिलेने आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं. लाल साडी परिधान केलेल्या या महिलेचा 'दो घूँट पिला दे साकिया' या गाण्यावरचा परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आजीबाईंची ऊर्जा, आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व पाहुणे त्यांच्याकडे एकटक पाहतच राहिले. @5\_churrets या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ 24 नोव्हेंबर 2025 रोजी शेअर करण्यात आला. "आजी तर हॅकर निघाली" असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले होते.
फॉरवर्ड फ्लिपने सगळेच अवाक!
व्हिडिओमध्ये आजी बीटवर नाचताना दिसत आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये गाण्याचा ताल जुळत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्टपणे दिसत होता. उपस्थित पाहुण्यांनी आजींभोवती गर्दी केली आणि त्यांचा परफॉर्मन्स आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करत होते.
पाहा VIDEO
डान्सदरम्यान, एका क्षणाला आजी सहजपणे गुडघ्यावर खाली बसल्या आणि फ्लिप मारली. आजींच्या या स्टेपने सर्वांना आश्चर्यचकित केले. उपस्थित सर्वांच्या तोंडून एकाच वेळी ओsss असं चकीत करणार शब्द बाहेर पडला.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. दर्शकांनी आजींच्या एनर्जी आणि आत्मविश्वासाचं कौतुक केलं. तसेच डान्स टायमिंगचीही वाहवा केली. एका युझरने म्हटलं, “सुपर दादी. अम्मा जी मार्शल आर्ट्स चॅम्पियन आहेत,” असे म्हटले. हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून त्याला 46.7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 20 लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.