Emotional Video: मेलेल्या पिल्लाला पाठीवर घेऊन समुद्रात भटकतेय डॉल्फिन; ड्रोन VIDEO पाहून डोळे पाणावतील

Fraggle Dolphin Video: पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर डॉल्फिन आई त्याला सोडण्यासाठी तयार नसल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात आपोआप पाणी येईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Viral Video: मेलेल्या पिल्लाला पाठीवर घेऊन कित्येक दिवस भटकतंय डॉल्फिन"
(फोटो- जिओग्राफ मरीन रिसर्च)

Fraggle Dolphin Video: ऑस्ट्रेलियाला लागून असलेल्या समुद्रात लोकांनी एक असे दृश्य पाहिले, ज्याने सर्वांनाच भावुक केले आहे. येथे एक डॉल्फिन आई कित्येक दिवसांपासून आपल्या मृत पिल्लाला स्वतःसोबत घेऊन पोहत होती. या डॉल्फिनचे नाव 'फ्रॅगल' (Fraggle) असे आहे. फ्रॅगलच्या पिल्लाचा जन्म अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी झाला होता, पण जन्मानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. पण आपल्या पिल्लाला सोडण्यास त्याची आई तयार नव्हती. समुद्रात ती आपल्या पिल्लाला कधी पाठीवर घेऊन पोहत होती तर कधी पुढे ढकत समुद्रात पोहोताना दिसली. 

ही घटना पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या 'लेशेनॉल्ट एस्ट्युअरी' (Leschenault Estuary) येथे घडली. या भागात राहणाऱ्या 'जिओग्राफ मरीन रीसर्च' (Geographe Marine Research) या संशोधक टीमने या वेदनादायक क्षणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. टीमने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, फ्रॅगल गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या पिल्लासोबत दिसत आहे. संशोधकांच्या मते, फ्रॅगलने याआधीही तिच्या चार पिल्लांना गमावले आहे. हिवाळ्याच्या हंगामात जन्मलेल्या या पिल्लासाठी जगणे सोपे नसेल, याचा अंदाज टीमला आधीपासूनच होता. काही वेळापूर्वीच त्यांनी पाहिले होते की, पिल्लाचे श्वास खूप वेगाने चालले होते. तेव्हापासूनच त्यांना भीती वाटू लागली होती की, कदाचित ते जास्त काळ जगू शकणार नाही.

Advertisement

(नक्की वाचा: Surat News: मृत्यूनंतरही मनुभाई जिवंत! तिघांना दिलं नवं आयुष्य; काळजाला भिडणारी स्टोरी, नेमकं काय घडलं?)

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, डॉल्फिन आपल्या पिल्लांसोबत खूप घट्ट नाते तयार करतात. जेव्हा एखाद्या पिल्लाचा मृत्यू होतो, तेव्हा अनेकदा आई त्याला कित्येक तास किंवा कित्येक दिवस स्वतःसोबत घेऊन फिरत राहते. वैज्ञानिक या वर्तनाला शोक किंवा दुःखाशी जोडून पाहतात.

(नक्की वाचा: VIDEO: "मम्मी बियर पिणार का?" लेकीचा प्रश्न, पुढं आईने शांतपणे जे केलं... दक्ष पालकांनी 'हा' व्हिडीओ पाहाच)

फ्रॅगल एकटी नव्हती!

व्हिडीओमध्ये आणखी एक मन हेलावून टाकणारी गोष्ट दिसून आली. दुःखाच्या या प्रसंगी फ्रॅगल एकटी नव्हती. तिच्या आजूबाजूला इतर डॉल्फिन सुद्धा पोहताना दिसले. जणू काही त्याही तिच्या दुःखात सहभागी झाल्या होत्या असे वाटत होते. रीसर्च टीमचे म्हणणे आहे की, त्या दिवशी समुद्रातून आलेल्या काही इतर डॉल्फिनसुद्धा स्थानिक डॉल्फिनसोबत उपस्थित होत्या. लेशेनॉल्ट एस्ट्युअरीमध्ये डॉल्फिनची संख्या खूप कमी आहे. येथे दरवर्षी नवजात डॉल्फिन पाहायलाही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत ही घटना केवळ दुःखदच नाही तर डॉल्फिनमधील कुटुंब आणि सहकार्याचे नाते किती मजबूत असते, हे देखील दर्शवते.


Topics mentioned in this article