तुळशीविवाह सुरू होताच लग्न सोहळ्यांनाही सुरुवात झाली आहे. तसेच 12 नोव्हेंबर रोजी ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांचा विवाहसोहळा उद्योगपती अनिश राजानींसोबत राजस्थानमधील कोटा येथे आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्यात राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक VIP मंडळींनीही उपस्थिती लावली होती. अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला असून, या विवाहसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
(नक्की वाचा: 'माझ्या मुलाचं करियर 4 जणांनी खराब केलं', संजू सॅमसनच्या वडिलांनी घेतली धक्कादायक नावं)
अंजली बिर्ला या आयएएस (IAS) आहे. अंजली बिर्लाचे पती अनिश हे उद्योगपती असून, त्याच्या धर्माबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. तन्वीर या ट्विटर युजरने या लग्नाबाबत आक्षेपार्ह कमेंट केली होती. मात्र, तो एक फेक आयडी होता. नंतर ते ट्विट डीलिट करण्यात आलं. मात्र तन्वीरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, "लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या मुलीचा विवाह अनिश रजानीशी या मुस्लीम मुलासोबत लावून दिला. अखेर असं काय कारण आहे की, आपल्या देशातील सर्व मुस्लीम विरोधी नेते त्यांच्या मुलींसाठी अनिश आणि मुख्तार अशी मुलं निवडतात. हिंदू जावई सापडत नाही का? तन्वीरचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. त्याचे ते ट्विट अपमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.
(नक्की वाचा: K3Gमधील लड्डूमध्ये 23 वर्षांनंतर झालाय इतका बदला, VIDEO VIRAL)
काय आहे सत्य?
फॅक्ट चेक केल्यावर, अंजली आणि अनिश यांचा विवाह हिंदू पद्धतीने पार पडलाय. अनिशच्या धर्माबद्दल सांगायचं झालं तर, ते हिंदू सिंधी आहेत. त्याचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथील असल्याचे समोर आलं आहे. या विवाह सोहळ्याला राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राजेंद्र सिंह राठोड, राज्याचे युवा कार्य मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, आमदार आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर बुधवारी बुंदी रोडवरील एका रिसॉर्टमध्ये 'रिसेप्शन' आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक मान्यवर पाहुण्यांसह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माही उपस्थित होते.