जाहिरात

Viral Video : एक दोन नव्हे 6 सिहांनी शेतात लावली होती फिल्डिंग..शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच घडलं असं काही..

बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवत आहेत. पण एका शेतकऱ्यासोबत असं काही घडलं आहे, ज्याचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

Viral Video : एक दोन नव्हे 6 सिहांनी शेतात लावली होती फिल्डिंग..शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच घडलं असं काही..
Farmer vs 6 Lions Video Viral

Lion vs Farmer Video Viral :  मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या दहशत माजली असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवत आहेत. पण एका शेतकऱ्यासोबत असं काही घडलं आहे, ज्याचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. शेतात निवांत बसलेल्या एका शेतकऱ्यासमोर एक दोन नव्हे तर चक्क 6 सिंहांचा कळपच बसला होता. सिंहांना पाहताच शेतकऱ्याने काय केलं? शेतात आरामात बसलेल्या शेतकऱ्यासोबत काय घडलं? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. शेतकरी आणि सिंहाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे.

या व्हिडीओत पाहू शकता, एक शेतकरी पाय पसरून एकदम आरामात शेतात बसलेला असतो. तो फोनच्या कॅमेरातून शेताचे दृष्य पाहत असतो.अगदी सामान्य व्हिडिओ वाटतो. पण जसं जसं तो कॅमेरा झूम करतो, त्यानंतर जे समोर दिसतं ते पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथे गाय किंवा कुत्रा नसून जंगलाचा राजा कळपासह ठाण मांडून बसला आहे. 

नक्की वाचा >> जगात सर्वात जास्त थंडी कुठे जाणवते? लोक -50 डिग्री तापमानातही कसे राहतात? व्हिडीओ पाहून हुडहुडीच भरेल

शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच नेमकं काय घडलं?

"व्हिडिओमध्ये तो शेतकरी आधी त्याचे पाय दाखवतो, जेणेकरून हे स्पष्ट होईल की तो शेतातच बसलेला आहे. त्यानंतर जेव्हा तो कॅमेरा झूम करतो, तेव्हा समोर एक सिंह आणि त्याचे पाच बछडे बसलेले दिसतात. साधारणपणे तो सिंहाच्या कळपापासून बऱ्यापैकी दूर बसलेला असतो. पण कॅमेरा झूम केल्यावर असे वाटते की सिंहांनी त्याला पाहिले आहे.व्हिडीओ पाहून असे वाटते की सिंह सतत त्याच्याकडे पाहत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील भुवतिंबी येथील आहे.

नक्की वाचा >> सीक्रेट सँटा नव्हे, हे तर सीक्रेट Swiggy, कोणी केली 1 लाख रुपयांच्या कंडोमची ऑर्डर? काय काय मागवलं? पाहा यादी

सिंहांचा खतरनाक व्हिडीओ होतोय व्हायरल

 "@siddhu_banna_0007 नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला 4 लाख 90 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच 60 लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. तसच या पोस्टवर 7 हजारांहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत."  एका युजरने व्हिडीओला कमेंट करत म्हटलंय, ‘कॅमेरामन कधी मरत नाही, म्हणूनच तू जिवंत आहेस.' दुसऱ्या युजरने म्हटले की ‘भाऊचं सिंहांसोबत उठणं-बसणं आहे.' तिसऱ्या युजरने म्हटलंय की, ‘भाऊ खरंच जिगरवाला आहे.‘पाच सिंह नाहीत, एक शेतकऱ्याची ताकद आहे, असंही एकाने म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com