मेडिकल सायन्समधील (Medical Science) एच अचंबित करणारं प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका गावात अत्यंत दुर्मीळ केस उघडकीस आली आहे. चार दिवसांपूर्वी जन्म झालेल्या एका नवजात बाळाच्या गर्भात जिवंत भृण असल्याचं सांगितलं जात आहे.
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील केसली ब्लॉक भागात एका महिलेची चार दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती. तिच्या नवजात बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाळाच्या सीटी स्कॅनमध्ये नवजात बाळाच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांनुसार, बाळाच्या पोटातील भ्रृणदेखील (Fetus in Fetu) जिवंत आहे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी नवजातचं परीक्षण केलं आहे. बुंदेलखंड मेडिकल कॉलेजच्या रेडियोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या करिअरमधील ही पहिलीच केस आहे.
नक्की वाचा - ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ
17 दिवसांपूर्वी तपासणीसाठी आली होती गर्भवती...
बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये रेडियोलॉडी विभागाचे एचओडी डॉ. पुण्य प्रताप सिंह यांनी सांगितलं की, साधारण 17 दिवसांपूर्वी केसली येथील निवासी 35 वर्षीय गर्भवती महिला तपासणीसाठी आली होती. सोनोग्राफी आणि सीटी स्कॅननंतर एक हैराण करणारी बाब समोर आली. ज्यामध्ये पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक जिवंत भृण आढळून आलं. महिलेची चार दिवसांपूर्वी प्रसृती झाली. यानंतर नवजात बाळाला एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. डॉ. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या करिअरमधील फीटस इन फीटू अंतर्गत ही पहिली केस आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्जरीचा एकमेव पर्याय...
तेथील एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फीटस इन फीटूच्या दुर्मीळ प्रकरणात भृणाच्या पोटातील भृण जिवंत राहू शकत नाही. आतापर्यंतच्या इतिहासात अशी एकही केस समोर आलेली नाही. बाळाचं शरीर खूप लहान असतं आणि गर्भात भृणाला पुरेसा रक्तपुरवठा, अन्य पोषक द्रव्य मिळू शकत नाही. ज्यामुळे भृण जिवंत राहू शकत नाही. अशावेळी सर्जरी करून बाळाच्या पोटातील भृण बाहेर काढावं लागेल.