नोकरी सोडण्याची अनेक कारणे असतात, कधी चांगल्या संधींसाठी, कधी पगार वाढीसाठी तर कधी वर्क-लाईफ बॅलन्ससाठी. पण अलीकडे एका Gen Z कर्मचाऱ्याने एक वेगळेच कारण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मजेशीर राजीनामा पत्राने सर्वांनाच हसायला लावले आहे. एका कर्मचाऱ्याने थेट ‘iPhone 17' घेण्यासाठी नोकरी सोडत असल्याचे सांगितले आहे.
या व्हायरल पत्रात कर्मचाऱ्याने लिहिले की, iPhone 17 बाजारात आला आहे. या पगारात त्याचा ईएमआय भरणे कठीण आहे. त्यामुळे मी चांगल्या पॅकेजसाठी दुसरी नोकरी शोधत आहे. या कर्मचाऱ्याने मोठ्या प्रामाणिकपणे नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे. मात्र, हे कारण वाचून अनेकांना धक्का बसला आणि हसूही आवरले नाही.
(नक्की वाचा- VIDEO: सगळ्यांना वाटलं अभिनय करतोय, 'रामलीला'दरम्यान कलाकाराचा स्टेजवरच हार्टअटॅकने मृत्यू)