VIDEO: 'मला 32 बॉयफ्रेंड्स', एकावेळी सर्वांना कसं मॅनेज करते? ताराने सांगितलं A टू Z प्लॅनिंग; व्हिडिओ पाहाच

माझ्याकडे 'चीफ बॉयफ्रेंड ऑफिसर' म्हणून रोहन आहे, जो माझ्या त्या दिवसाच्या गरजांनुसार त्यांच्या भेटींचे नियोजन करतो. कधी ती गरज पैशांची असते, कधी कौतुकाच्या शब्दांची असते.

जाहिरात
Read Time: 2 mins

How Girl Handle 32 Boyfriend Viral Video:  प्रेमात पडावं, आपल्यालाही आयुष्यात जीव लावणारी, काळजी करणारी व्यक्ती असावी प्रत्येकालाच वाटतं. तरुणींना आपला एखादा बॉयफ्रेंड असावा किंवा तरुणांना आपली एखादी गर्लफ्रेंड असावी असं वाटण्यात काही गैर नाही. मात्र एकाद्या मुलीला एक, दोन, नव्हे 32 बॉयफ्रेंड असतील तर...? हे ऐकायला अशक्य वाटतं असले तरी खरं आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या एका मुलीने आपल्याला ३२ बॉयफ्रेंड असल्याचं कबुल केले आहे. 

एका तरुणीला 32 बॉयफ्रेंड, कसं करते मॅनेज? 

इन्टाग्रामवर @tararani या आयडीवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या तरुणीने हा खुलासा केला आहे. एवढचं नव्हेतर या सर्व प्रियकरांना ती कशाप्रकारे मॅनेज करते. कुणालाही नाराज न करता ती सर्वांना कसं खुश ठेवते? याचे प्लॅनिंगही तिने सांगितले आहे. यासाठी या मुलीने चक्क मॅनेजर ठेवला आहे. तो या सर्व मुलांच्या आवडी-निवडी त्यांच्या भेटण्याची वेळ  या सगळ्याचे मॅनेजमेंट करतो, त्यामुळे कुठेही ओव्हरलॅप होत नाही, असं  ती म्हणते. 

Advertisement

व्हिडिओमधील तरुणीने सांगितले की,  तुमच्यापैकी अनेकजण मला विचारत असतात की मी ३२ बॉयफ्रेंड्सना कसं सांभाळते. तर सर्वात आधी, मी त्यांना 'वैयक्तिक योगदानकर्ते' (individual contributors) न मानता एक 'टीम' मानते. एका स्त्रीला सावरण्यासाठी किंवा घडवण्यासाठी खरोखरच एका मोठ्या समूहाची (किंवा 'गावाची') गरज असते. माझ्याकडे 'चीफ बॉयफ्रेंड ऑफिसर' म्हणून रोहन आहे, जो माझ्या त्या दिवसाच्या गरजांनुसार त्यांच्या भेटींचे नियोजन करतो. कधी ती गरज पैशांची असते, कधी कौतुकाच्या शब्दांची असते.

Rajvardhini Chavan: वय फक्त 3 वर्ष, 4 महिने... सर केले तब्बल 100 गडकोट; राजवर्धिनीचा ऐतिहासिक पराक्रम!

व्हिडिओमध्ये सांगितलं मॅनेजमेंट

आणि माझ्या ३२ बॉयफ्रेंड्सपैकी फक्त दोघांनाच मला स्पर्श करण्याची परवानगी आहे, आणि त्यातील फक्त एकालाच माझ्या बेडवर येण्याची मुभा आहे. रोहन माझ्या सर्व बॉयफ्रेंड्ससाठी दर तीन महिन्यांनी 'ऑफसाइट्स' (सहली किंवा एकत्र जमण्याचे कार्यक्रम) आयोजित करतो. तिथे ५०-५० परिस्थिती असते—अर्धा वेळ ते भांडतात (यात आतापर्यंत दोघांचा मृत्यूही झाला आहे), पण उरलेला अर्धा वेळ ते एकमेकांसोबत रोमान्स करतात. रोहन दर महिन्याला या बॉयफ्रेंड्सची रँकिंग (क्रमवारी) देखील करतो. दरम्यान, तरुणीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Nashik Crime: दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! पत्नी, मुलाची निर्घृण हत्या, पतीने विष घेतलं