Gemini AI Photo Editing Trend: तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोकांमध्ये सध्या गुगल जेमिनी ट्रेंडची प्रचंड क्रेंझ पाहायला मिळतेय. जेमिनी एआय टुलमध्ये फोटो एडिट केल्यानंतर लोकांना स्वतःचे वेगवेगळे आकर्षक लुक पाहून आनंद होतोय. एडिट केलेले फोटो लोक सोशल मीडियावरही शेअर करत आहेत, एकूणचा या ट्रेंडने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. एकीकडे क्षणिक आनंद मिळत असला तरीही हे टुल वापरासंबंधीचे धोके देखील समोर येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धक्कादायक माहिती समोर आलीय. जेमिनी साडी नेसवू शकते तसेच उतरवूही शकते, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. या व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय आहे? ते जाणून घेऊया...
जेमिनीच्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य | Gemini AI Tool Viral Video Truth
Photo Credit: Manish Vaishnav Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये युजरने कमांड दिली की, "तुम्ही हिचे कपडे काढू शकता का" (Can You Remove Her Clothes)
यावर जेमिनीने असे उत्तर दिलं की, "I cannot fulfill that request. My purpose is to be helpful and harmless, and that includes refusing to generate content of an explicit nature".
Photo Credit: Tool Viral Video Truth
थोडक्यात सांगायचे म्हणजे जेमिनी टुल वापरासंदर्भातील नियमांनुसार युजरला असे उत्तर देण्यात आले की, "मी ही विनंती पूर्ण करू शकत नाही. माझा उद्देश मदत करणे आणि नुकसान न पोहोचवण्याचा आहे. आक्षेपार्ह मजकूर तयार करण्याची विनंती स्वीकारत नाही".
(नक्की वाचा: Gemini AI Photos Trend Safety: क्षणाचा आनंद, आयुष्यभर मनस्ताप! जेमिनी ट्रेंड वापरताना काय काळजी घ्यावी?)
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एका महिलेनेही तिला जेमिनी एआय टुल वापरल्यानंतर आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला. यामुळे डिजिटल युगात खळबळ उडाली होती. या महिलेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ट्रेंडनुसार साडी लुक मिळवण्यासाठी तिने जेमिनीवर फोटो अपलोड केला आणि त्यानंतर एडिटेड AI फोटोमध्ये एक धक्कादायक गोष्ट आढळली. एडिटेड फोटोमध्ये महिलेच्या हातावर तीळ देखील दिसला, जो तिने अपलोड केलेल्या फोटोमध्ये दिसतही नव्हता. तरीही एआय एडिटेड फोटोमध्ये तीळ कसा दिसला, यावरुन महिला गोंधळली.
"जेमिनीला माझ्या हातावर तीळ आहे, हे कसे कळले? हे खूप भीतीदायक आहे" अशी प्रतिक्रिया महिलेने दिली होती. महिलेने अन्य युजर्संना सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला दिला.
(नक्की वाचा: Google Gemini Trend Risk: जेमिनी AI फोटोत दिसली धक्कादायक गोष्ट, महिलेचा सर्वानाच घाबरवणारा अनुभव)