Pet Dog Attack on Women : मोकाट कुत्र्यांची दहशत हा देशातील सर्वच शहरांमध्ये तसंच ग्रामीण भागातही मोठा प्रश्न आहे. या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटना वारंवार उघड होत असतात. कुत्र्याच्या दहशतीपासून स्वत:चा बचाव करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील एका सोसायटीमधील ही घटना आहे. या सोसायटीमधील महिला कुत्रा चावू नये यासाठी धडपड करत होती. त्यामध्ये ती महिला दहा फुट उंच कठड्यावरुन खाली पडली. त्यामध्ये तिचा मणका मोडल्याची माहिती आहे. महिलेच्या नवऱ्यानं केलेल्या तक्रारीनंतर कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
पोलीस अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार शैयद अतहर ही 37 वर्षांची महिला सोसायटीच्या परिसरात फिरत होती. त्यावेळी येथील अन्य रहिवाशी मंदिरा मित्रा यांचा पाळीव कुत्रा हल्ला करण्यासाठी त्यांच्या दिशेनं धावला. या हल्ल्यातून बचाव करण्याच्या नादात अतहर दहा फुट उंच कोठडीवरुन खाली पडल्या.
हा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 31 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महिला त्यांच्या कुत्र्यासोबत सोसायटीच्या आवारात फिरताना दिसत आहे. तर अतहर त्यांच्यासमोरुन येत होत्या. त्यावेळी हा कुत्रा त्यांच्यावर भुंकतो आणि हल्ला करतो.
( नक्की वाचा : Madhuri Dixit : 'पाकिस्ताननं युद्ध जिंकलं तर माधुरी दीक्षितला घेऊन जाईन', मौलानाचं संतापजनक वक्तव्य, Video )
महिलेचा मणका तुटला
या व्हिडिओनुसर अतहर कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी कठड्याव चढतात. त्याचवेळी त्यांचा तोल जातो आणि त्या खाली पडतात. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा मणका तुटला असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी मंदिरा मित्रा विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.