Wedding Cancels After Groom Dances On Choli Ke Peeche: लग्नात नाचणे नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. 'चोली के पिछे क्या है...' या गाण्यावर नवरदेवाने केलेला डान्स त्याचं लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. नवरदेवाचा डान्स पाहून नवरी मुलीचे वडील मुलावर प्रचंड चिडले आणि त्यांनी लग्न मोडलं. अनेकांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते ठाम राहिले.
नवी दिल्लीतील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या मित्रांनी त्याला डान्स करण्यास सांगितले होते. नवरदेव जेव्हा नाचण्यासाठी उभा राहिला तेव्हा प्रसिद्ध बॉलिवूड गाणे 'चोली के पीचे क्या है' वाजलं. नवरदेवाने मित्रांसोबत या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. वराला नाचताना पाहून अनेक पाहुण्यांनीही त्याला प्रोत्साहन दिलं.मात्र नवरीच्या वडिलांना नवरदेवाचं हे कृत्य अजिबात आवडलं नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलीच्या वडिलांनी नवरदेवाचं नाचणं योग्य नाही, म्हणून त्यांनी लगेच लग्न थांबवण्याची घोषणा केली. नवरीच्या वडिलांनी म्हटलं की, नवरदेवाचे असे वागणे त्यांच्या कुटुंबाच्या मूल्यांचा अपमान करणारे आहे. वडिलांचे बोलणे ऐकून नवरी देखील रडू लागली. नवरीने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते.
(नक्की वाचा- CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)
मजा-मस्तीत हा सर्व डान्स सुरु होता, असं नवरीने रडत आपल्या वडिलांना सांगितले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. लग्न मोडल्यानंतरही नवरीच्या वडिलांचा राग शांत झाला नाही. त्यांनी आपल्या मुलीला स्पष्टपणे सांगितले की नवरा मुलीच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही. या घटनेनंतर आनंदाचं वातावरण असलेल्या लग्नमंडपात स्मशान शांतता पसरली. क्षणात सगळंकाही बदललं. या घटनेचे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.
(नक्की वाचा- MPSC प्रश्नपत्रिका 40 लाखात देण्याचं आमीष; 'ती' उच्चपदस्थ महिला अधिकारी कोण? )
एका यूजरने लिहिले की, "सासऱ्यांनी योग्य निर्णय घेतला, नाहीतर हा डान्स रोज पहावा लागला असता." दुसऱ्या युजरने लिहिले की, "हे अरेंज्ड मॅरेज नव्हते, एलिमिनेशन राऊंड होता."