लग्न म्हटलं की त्यासाठी खास नियोजन करावं लागतं. लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी खास गोष्टी करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असते. आता तर हळद, मेंदी अशा पारंपरिक गोष्टींचेही इव्हेंट केले जातात. या सगल्यात डीजे ही कॉमन गोष्ट असते. मात्र दिल्लीत डीजेमुळे एक लग्न मोडल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीतील एका लग्नात डीजेने उत्सवाचे वातावरण पूर्णपणे बिघडवले. रणबीर कपूरचं "ए दिल है मुश्कील" सिनेमातील "चन्ना मेरेया..." गाणं ऐकताच नवरदेवाला त्याच्या प्रेयसीची आठवण आली आणि त्याने लग्न रद्द केले. सोशल मीडियातून ही बातमी समोर आली आहे, एनडीटीव्ही या वृत्ताची पुष्टी करत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार , दिल्लीतील एका लग्नात डीजेने 'चन्ना मेरेया' वाजवले. गाणे ऐकताच, नवरदेवाला त्याच्यी प्रेयसीची आठवण आली आणि तो इमोशनल झाला. यामुळे हे लग्न मोडलं आणि नवरदेव मिरवणुकीसह परतला.
गौरव कुमार गोयल (@sarcasmicguy) या अकाऊंवरुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. व्हिडिओसह असणारी ही पोस्ट व्हायरल झाली आहे. मात्र ही घटना कधी आणि कुठे घडली याची अद्याप कोणतीही माहिती नाही.
व्हायरल पोस्टवर अनेकांना कमेंट केल्या आहेत . "लग्नाआधी वराला त्याच्या खऱ्या भावना समजावून सांगितल्याबद्दल अनेकांनी डीजेचे आभार मानले." आणखी एकाने कमेंट केली की दोन लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा धोका पत्करण्यापेक्षा ते आधीच लक्षात घेणे चांगले."