120 KM वेग आणि काही सेकंदामध्येच 7 जणांचा मृत्यू, गुजरातमधील अपघातापूर्वीचा पाहा VIDEO

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मित्रांसोबत ट्रिपला जायला आणि ट्रिपमध्ये भरपूर मस्ती करायला सर्वांना आवडतं. पण मस्तीच्या नादात 120 किलोमीटर वेगानं जाणं किती योग्य आहे याचा विचार सर्वांनीच करायला हवा.गुजरातमधील साबरकांडामध्ये बुधवारी असाच एक अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये सर्वजण ट्रिपचा आनंद साजरा करताना मोठ्या आवाजात गाणं ऐकताना दिसत आहेत. पण, त्याचवेळी त्यांची कार 120 किलोमीटर वेगानं धावत होती. आनंदात ट्रिपची मजा लुटणाऱ्या कुणीही हा आपल्या आयुष्यातील शेवटचा क्षण आहे, याची कल्पना केली नसेल. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अपघाताच्या काही मिनिटाआधीचा व्हिडिओ

हा व्हिडिओ अपघाताच्या काही आधीचा आहे. भरत केसवाणी या व्यक्तीनं त्यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सवर हा व्हिडिओ ठेवला होता. या अपघातामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. या व्हिडिओमध्ये कारमधील सर्व जण वेगाचा आनंद घेत गाणं म्हणत आहेत. 

राजस्थानला जाताना अपघात

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण विदेशातून आलेल्या त्यांच्या मित्रासोबत फिरायला राजस्थानमध्ये जात होते. त्यांची कार हिम्मतनगरमध्ये पोहोचली त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. आठवा व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

( नक्की वाचा : कामाच्या तणावामुळे आणखी एक मृत्यू? HDFC बँकेतील अधिकारी खुर्चीवरुन पडली आणि.... )