जाहिरात
This Article is From Sep 25, 2024

कामाच्या तणावामुळे आणखी एक मृत्यू? HDFC बँकेतील अधिकारी खुर्चीवरुन पडली आणि....

HDFC बँकेत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा कामावर असताना संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. 

कामाच्या तणावामुळे आणखी एक मृत्यू? HDFC बँकेतील अधिकारी खुर्चीवरुन पडली आणि....
मुंबई:

पुण्यातील Ernst & Young कंपनीच्या एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटन्ट (Chartered Accountant) अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिलच्या (Anna Sebastian Perayil) मृत्यूने देशभर खळबळ उडाली आहे. अ‍ॅनाचा मृत्यू कंपनीच्या कामाचं प्रेशर सहन न केल्यामुळे झाला असा आरोप तिच्या आईनं केला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुुरु आहे. त्याचवेळी HDFC बँकेत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा कामावर असताना संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सदफ फतिमा (वय 45) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव होतं. त्या लखनौमधील विभूतीखंड ब्रँचमध्ये अ‍ॅडिशनल डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होत्या. मंगळवारी दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये काम करत असताना त्या अचानक बेशुद्ध होईन पडल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

'दैनिक भास्कर'नं या प्रकरणात दिलेल्या वृत्तानुसार फातिमा यांच्यावर कामाचा दबाव होता, असा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबात पोस्ट मार्टम रिपोर्टनंतरच अधिक माहिती समजू शकेल, अशी माहिती विभूतीखंडचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामधरन सिंह यांनी 'ANI' या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य

( नक्की वाचा : मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य )

 समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेबाबत सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट केलं आहे. ही घटना देशातील सध्याच्या अर्थव्यवस्थेतील दबावाचं प्रतिक आहे. या संदर्भात सर्व कंपन्या तसंच सरकारी विभागानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ही देशाच्या मनुष्यबळाची अपरिमित हानी आहे. या पद्धतीनं झालेल्या आकस्मिक निधनामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोणत्याही देशाच्या खऱ्या विकासाचा मापदंड हा उत्पादनाचे आकडे वाढवणे हा होऊ शकत नाही. तर तेथील व्यक्ती मानसिक दृष्टीनं किती स्वतंत्र, निरोधी आणि प्रसन्न आहे हा आहे,' असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. 

पुण्यात काय झालं होतं?

केरळच्या चार्टर्ड अकाऊंटन्ट अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिलने मार्चमध्ये Ernst & Young  कंपनी जॉइन केली होती. यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये म्हणजे जुलै महिन्यात तिचा मृत्यू झाला. नाच्या मृत्यूमागे तिच्या आईने कंपनीला दोषी ठरवलं आहे. तिच्यावर खूप जास्त कामाचा ताण दिला जात होता, यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा दावा अ‍ॅनाच्या आईने केला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: