जाहिरात
This Article is From Mar 21, 2024

तुमचा मूड खराब करण्यासाठी मार्केटमध्ये आलाय 'फर्जी गुलाबजाम', पाहिल्यानंतर म्हणाल....

हा व्हिडीओ पाहून गुलाबजाम आवडणारी सारी मंडळी भयंकर संतापली आहेत.

तुमचा मूड खराब करण्यासाठी मार्केटमध्ये आलाय 'फर्जी गुलाबजाम', पाहिल्यानंतर म्हणाल....
घरोघरी केल्या जाणाऱ्या गुलाबजामचं हे एक नवं रुप आहे.
मुंबई:

खवय्या मंडळींना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी हॉटेलमालक वेगवेगळे प्रयोग करत असतात. काही जण नवीन खाद्यपदार्थ तयार करतात. तर काही लोकप्रिय खाद्यपदार्थांना नवं रुप देतात. सर्वांना आवडणाऱ्या, घरोघरी केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नवं रुप पाहून कधी हसू येतं तर कधी आश्चर्य वाटतं. पण, काही व्हिडीओ पाहिल्यानंतर युझर्सचा राग आवरत नाही. सध्या देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये स्पेशल गुलाबजाम सर्व्ह करताना अजब प्रयोग करण्यात आले आहेत.  गुलाबजाममध्ये वाट्टेल ते घालण्याचा हा प्रकार तब्येतीलाही धोकादायक आहे, असं काही युझर्सनी म्हंटलं आहे.

हे काय सुरु आहे....

अर्चना राय या युझरनं हा व्हिडीओ शेअर केलाय. 'सादर आहे, फर्जी स्पेशल गुलाबजाम' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. एका खास भांड्यावर प्लेट ठेवून घेऊन येतो. त्यामध्ये गुलाबजामसह गुलाबाचं फुल देखील आहे. ही डिश तो खास पद्धतीनं सर्व्ह करतो. तो सुरुवातीला काही छोट्या मिठाईंवर फ्रोजन रबडी टाकतो. त्यामध्ये ब्लू बेरीज मिसळतो. हे कमी की काय तर गुलाबही त्यामध्ये फ्रिज करुन वरुन टाकतो आणि हे एकत्र सर्व्ह करतो.'
 

'तिखट -मीठ हवं होतं'

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. त्याला हजारो जणांनी लाईक केले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये थोडं तिखट-मीठही टाकायला हवं अशी प्रतिक्रिया एकानं दिलीय. तर आणखी एका युझरनं 'चीज आणि अमूल बटर राहिलं,' असं म्हंटलंय. तर आता तुमचं बिल 9 कोटी 99 लाख रुपये बिल येईल असा अंदाज एका युझरनं व्यक्त केलाय. या डिशमधील 'गुलाबजाबम शोधण्यासाठी जेसीबीच्या मदतीनं खोदकाम केलं पाहिजे.' तर यामधील लिक्विड नायट्रोजन अत्यंत धोकादायक आहे. हे फ्रोजन फूडमध्ये मिसळलं तर मोठं नुकसान होतं,' असा इशारा एका युझरनं दिलाय.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com