जॉन सीनाने 'त्या' चॅम्पियनला हलक्यात घेतलं! शेवटच्या सामन्यात हरला, WWE व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

जॉन सीनाचा WWE प्रवास संपला आहे. 48 वर्षीय जॉनचा शनिवारी करिअरच्या शेवटच्या सामन्यात गुंथरविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर जॉनने 23 वर्षांच्या करिअरला बायबाय केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
john cena wwe final match video

John Cena WWE Career Final Match Video : जॉन सीनाचा WWE प्रवास संपला आहे. 48 वर्षीय जॉनचा शनिवारी करिअरच्या शेवटच्या सामन्यात गुंथरविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर जॉनने 23 वर्षांच्या करिअरला बायबाय केलं. निवृत्तीच्या वेळी जॉन खूपच भावुक दिसत होता.जॉन सीनाने शेवटच्या लढतीची सुरुवात अप्रतिम केली होती.त्याने गुंथरला खांद्यावर उचलून रिंगमध्ये आपटलेही होते.त्या क्षणी असे वाटत होते की, सीना विजयासह करिअरला निरोप देईल.पण सामना जसजसा पुढे गेला,तसतसा सीना कमकुवत होत गेला.तो अचानक खूपच कमजोर दिसू लागला. शेवटच्या क्षणी स्लीपर लॉकमुळे त्याची ताकद कमी झाली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात असे वाटत होते की,जॉन हार मानत आहे आणि अखेरीस त्याला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना इतका रोमांचक होता की प्रेक्षक खुर्च्यांना खिळून बसले होते. जवळपास 20 वर्षांत पहिल्यांदाच जॉन सीना एखाद्या सामन्यात ‘टॅप आउट' झाला.

कर्ट अँगलविरुद्ध WWE मध्ये पदार्पण केलं होतं 

जॉन सीनाचे व्यावसायिक करिअर अत्यंत प्रभावी राहिले आहे. त्याने 2002 मध्ये स्मॅकडाऊनच्या एका एपिसोडमध्ये कर्ट अँगलविरुद्ध WWE मध्ये पदार्पण केले होते. सीनाचा प्रवास सोपा नव्हता आणि करिअरच्या सुरुवातीला त्याला खूप संघर्ष करावा लागला. एक काळ असा होता की त्यांना रिलीज केले जाऊ शकते अशी शक्यता होती. 2004 मध्ये त्याने रेसलमेनियामध्ये पदार्पण केले आणि बिग शोला पराभूत करून यूएस चॅम्पियनशिप जिंकली. या किताबानंतर जॉनने मागे वळून पाहिले नाही आणि पुढील दोन दशकांत WWE रिंगमधील मोठे आणि लोकप्रिय नाव म्हणून उदयास आले.

नक्की वाचा >> Kalyan News : रॅपिडो बाईक बुक करण्याआधी 100 वेळा विचार करा, कल्याणमध्ये चालकाने तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य!

इथे पाहा जॉन सीनाच्या शेवटच्या सामन्याच्या ्व्हिडीओ

जॉन सीना व्यावसायिक रेसलिंगमध्ये 17 वेळा विश्वविजेते ठरले आहेत. ते तीन वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन आणि विक्रमी तेरा वेळा WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन राहिले आहेत. या स्पर्धांव्यतिरिक्त,जॉनने WWE अमेरिकन चॅम्पियनशिप चार वेळा आणि वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियनशिप पाच वेळा जिंकली आहे. WWE मध्ये सीना यांनी एकूण 2259 सामने खेळले आहेत.

नक्की वाचा >> 100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..

Topics mentioned in this article