Cab Driver vs Woman Video : एक कॅब ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादविवाद होत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. प्रवाशांसोबत हुज्जत घालणाऱ्या कॅब ड्रायव्हरचे धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच बंगळुरूमध्येही एक कॅब ड्रायव्हर आणि महिला प्रवाशामध्ये ड्रॉप लोकेशनवरून वाद झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. चालकाने दावा केला आहे की, महिलेनं त्याला 15 मिनिटे वाट पाहायला लावली. दुसरीकडे महिलेनं आरोप केला आहे की, कॅब ड्रायव्हरने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. दोघांमधील '100 मीटर'चा वाद काय आहे? जाणून घ्या..
महिला प्रवासी आणि कॅब ड्रायव्हर यांच्यात नेमकं काय घडलं?
बंगळुरूमध्ये एक महिला प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. वाद हा ना भाड्याचा होता,ना रस्त्याचा..फक्त ‘100 मीटर'च्या अंतरामुळे आणि बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांच्यात वाद पेटला.दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्यांवरील दबाव आणि ग्राहकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नक्की वाचा >> मुंबई होणार झोपडपट्टीमुक्त! लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय
इथे पाहा महिला अन् ड्रायव्हरचा व्हायरल व्हिडीओ
This Hindi lady abuses Cab driver after he refuses to go back 100 mtrs from the destination.
— Kr!§hhh_ಚೇ 👑 (@ITSCK47) December 12, 2025
When cab driver says this the location and he can't go back. She abused him calling nonsense.
Driver claims she didn't know the exact location and made him roam for 10-15 mins now she… pic.twitter.com/iOgmpnCD9M
व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका तणावपूर्ण परिस्थितीत होते.एक अॅप-आधारित कॅब ड्रायव्हर महिला प्रवाशाला पुन्हा पुन्हा सांगत होता की, 'तुम्ही तुमचं लोकेशन तपासा'.यावर चालक म्हणाला की, तो तिला ड्रॉप लोकेशनपासून 100 मीटर दूर किंवा मागे उतरवू शकत नाही.वाद तेव्हा अधिक वाढला जेव्हा ड्रायव्हरने अरेरावीची भाषा वापरली.
“मी किती वेळ वाट पाहू? तुम्ही लोकेशन नीट का ठरवले नाही?”, असं चालकाने त्या महिलेला विचारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.दरम्यान, महिलेनं परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण हा वाद सुटण्याऐवजी अधिकच वाढला. महिलेनं आरोप केला की, ड्रायव्हर तिच्यावर ओरडत होता. त्यामुळे तिने स्वत:च्या बचावासाठी या घटनेचा व्हिडीओ बनवला. यावर ड्रायव्हरने प्रत्युत्तर देत म्हटलं, “हा व्हिडीओ बनवणे मुर्खपणा आहे".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world