जाहिरात

Kalyan: कल्याणच्या या भागात भयंकर घटना, रॅपिडो चालकाने तरुणीवर अंधारात केला अतिप्रसंग, जिमला जाताना काय घडलं?

कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटारसायकल बुक केली होती.

Kalyan:  कल्याणच्या या भागात भयंकर घटना, रॅपिडो चालकाने तरुणीवर अंधारात केला अतिप्रसंग, जिमला जाताना काय घडलं?
Rapido Driver Shocking News
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Crime News : कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणीने सायंकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटारसायकल बुक केली होती. परंतु, चालकाने त्या तरुणीला जिममध्ये न सोडता कल्याण पश्चिमेतील पोलीस लाईनजवळील अंधाराच्या ठिकाणी नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी आरडाओरड केली.

तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक एकत्र आले त्यांनी या घटनेबाबत विचारपूस केली. त्यानंतर पीडित तरुणीने रॅपिडो चालकाच्या धक्कादायक प्रकराबाबत नागरिकांना सांगितलं. संतापलेल्या नागरिकांनी नराधम रॅपिडो चालकाला भररस्त्यात चोप दिला. पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेतली असून आरोपी चालकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केलीय. तरुणीची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.

नक्की वाचा >> सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

मिळालेल्या माहितीनुसार, रॅपिडो चालकाने कल्याणच्या पोलीस लाईनजवळील अंधाराच्या ठिकाणी एका तरुणीसोबत अतिप्रसंग केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कल्याण परिसरात ही भयंकर घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित तरुणीचं शारीरिक शोषण करण्याऱ्या आरोपीला नागरिकांनी भररस्त्यात चोपला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला.  पोलिसांकडून तरुणीची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी चालकाविरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नक्की वाचा >> 100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com