Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, पण काही व्हिडिओ थेट काळजाला भिडतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय ग्राहकांसोबत बसून जेवताना दिसत आहे. युनिफॉर्म घातलेला हा तरुण ग्राहकांनी दिलेल्या अन्नाकडे पाहून इतका भावुक झाला की त्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
"मी विसरलो होतो की मला भूक लागली आहे"
व्हिडिओमध्ये दिसते की, ग्राहकांनी या डिलिव्हरी बॉयला त्यांच्यासोबत जेवायला बोलावले. समोर ठेवलेल्या जेवणाकडे पाहून तो विचारतोय की, "हे मी खाऊ शकतो का?" पुढे तो रडत रडत म्हणाला, "मी सकाळी घरून निघताना फक्त एक कप चहा प्यायलो होतो. दिवसभर काम करताना मलाही जाणीव झाली नाही की मला भूक लागली आहे." इतके बोलून तो ढसाढसा रडू लागला. ग्राहकांनी त्याला प्रेमाने सावरलं आणि जेवण करण्यास सांगितले.
(नक्की वाचा- Deepika Padukone: दीपिकाचा संयम सुटला! मुंबईच्या सद्यस्थितीवर ट्वीट; BMC ला टॅग करत म्हणाली...)
स्वतःपेक्षा मुलांची चिंता
माणसाला स्वतःच्या पोटापेक्षा आपल्या मुलांच्या पोटाची काळजी जास्त असते, हे या डिलिव्हरी बॉयच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्वतः जेवत असताना त्याने ग्राहकांना विचारले की, "बाकी उरलेले जेवण मी माझ्या मुलांसाठी घेऊन जाऊ शकतो का?" यावर उदार ग्राहकांनी देखील सांगितलं की, तुझ्या घरच्यांसाठी आम्ही वेगळे जेवण पॅक करत आहोत, हे टेबलवरचे जेवण फक्त तुझ्यासाठी आहे. विचारपूस केल्यावर त्याने सांगितले की त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ज्यांच्या भविष्यासाठी तो दिवसरात्र राबतोय.
(नक्की वाचा- Rename Taj Mahal: 'ताजमहल'चे नाव बदलणार? केंद्र सरकारने संसदेत दिलं उत्तर)
व्हिडीओ पाहून सारेच झाले भावुक
हा व्हिडिओ @Warlock_Aditya नावाच्या एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला असून तो सर्वत्र शेअर केला जात आहे. आजच्या धावपळीच्या युगात जिथे अनेकदा डिलिव्हरी उशिरा आल्यावर ग्राहक ओरडतात, तिथे या ग्राहकांनी दाखवलेले हे प्रेमळ वर्तन सकारात्मक परिणाम करणारे आहे.