How High Planes Fly : जेव्हा तुम्ही विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहता,तेव्हा खाली ढग दिसतात. त्या क्षणी असं वाटतं की, आपण अगदी आकाशाच्या उंबरठ्यावरच आहोत.पण प्रत्येक विमानाची एक कमाल उंची असते, याबाबत अनेकांना माहित नाही. विमान किती उंचीपर्यंत जाऊ शकतं? जर विमान त्यापेक्षा अधिक उंचीवर गेलं, तर काय होऊ शकतं? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
बहुतांश व्यावसायिक प्रवासी विमानं 31,000 ते 42,000 फूट उंचीवर उडतात.हा भाग स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या स्तरात येतो.येथे हवाई वाहतूक अधिक सुरळीत असते आणि वादळे व टर्ब्युलन्ससारख्या हवामानाशी संबंधित अडचणी कमी प्रमाणात असतात. प्रत्येक विमानाची एक कमाल सुरक्षित उंची असते,ज्याला ‘सर्व्हिस सीलिंग' असं म्हणतात.आधुनिक जेट विमानांसाठी ही उंची 45,000 फूट असते.
नक्की वाचा >> Vande Bharat Video : वंदे भारत ट्रेनमध्ये जेवताना 100 वेळा विचार करा! जेवणात काय काय आढळलं? प्रवासी संतापले
विमान खूप जास्त उंचीवर गेल्यास नेमकं काय घडतं?
जास्त उंचीवर हवा विरळ होते.विरळ हवा ड्रॅग कमी करते आणि इंधनाची बचतही होते. पण त्याचबरोबर ती गंभीर आव्हानांचाही सामना करावा लागतो.इंजिनला कमी ऑक्सिजन मिळतो. विमानाचे पंख कमी प्रमाणात झेप घेतात आणि चुका होण्याची शक्यता खूपच कमी होते.जेट इंजिन इंधन जाळण्यासाठी हवेतून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर अवलंबून असतात.जर एखादे विमान खूप जास्त उंचीवर गेले,तर ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी होते की, इंजिन फ्लेम-आउट होऊ शकते.याचा अर्थ इंजिन तात्पुरते बंद पडते."
नक्की वाचा >> Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
विमानाच्या पंखांना झेप घेण्यासाठी दाट हवेची गरज
विमानाच्या पंखांना झेप घेण्यासाठी करण्यासाठी दाट हवेची गरज असते.खूप विरळ हवेत विमानाला हवेत राहण्यासाठी अधिक वेगाने उडावे लागते.यामुळे ‘कॉफिन कॉर्नर' नावाचा धोका निर्माण होतो. विमानाचा वेग जवळजवळ तितकाच असतो जितक्या वेगाने अपघात होऊ शकतो.अशा परिस्थितीत एक छोटीशी चूकही विमानाला धोका निर्माण करू शकते. खूप जास्त उंचीवर सुरक्षित केबिन प्रेशर राखणे खूप कठीण होते. जर प्रेशरायझेशन फेल झाले, तर प्रवासी आणि क्रूला काही सेकंदांत ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते. ज्यामुळे ते बेशुद्ध पडू शकतात. म्हणूनच विमानांची रचना उंचीची मर्यादा आणि आपत्कालीन परिस्थितीत लँडिगच्या पद्धती पद्धती लक्षात घेऊन केली जाते.