लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Vande Bharat Train Shocking Video Viral : मुंबई-नांदेड वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या ट्रेनमध्ये असलेल्या रेल्वेच्या कँटिंनमध्ये मिळणाऱ्या जेवणात केस आढळल्याची पुन्हा उघडकीस आली आहे. जेवणाबाबतचा हा धक्कादायक प्रकार एका आठवडण्यात दोनदा समोर आल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रवाशांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मंहमद बय्यास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावातील व्यवसायिक आहेत.ते महिन्यातून 2-3 वेळा वंदे भारत ट्रेनने नियमितपणे प्रवास करतात.परंतु, मागील आठवड्यात रेल्वेच्या कँटिंनमधील जेवणात केस आढळल्याचं त्यांनी पाहिलं. असा प्रकार दोनदा घडल्याने त्यांनी याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.
नक्की वाचा >> मुंबईत भाड्याच्या घरात राहायचंय? अभिनेत्रीनेचा 'हा' व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील, म्हणाली, "घरमालक.."
मुंबई नांदेड वंदे भारत ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई नांदेड वंदे भारत गाडी नबंर 20706 मुंबई ते जालना प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली. त्यांनी याबाबत रेल्वेच्या टीटीईकडेही तक्रार नोंदवली. त्यानंतर टीटीईने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. कँटिंगच्या ठेकेदाराला जेवणाच्या दर्जाबाबत नोटिसही बजावण्यात आली होती.परंतु, 26 डिसेंबरला रेल्वे प्रवासादरम्यान पुन्हा जेवणात केस आढळून आला.
नक्की वाचा >> दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का
इथे पाहा वंदे भारत ट्रेनमधील धक्कादायक व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) December 27, 2025
तसच प्रवाशांना कच्चा पोळ्याही दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. रेल्वेच्या या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. रेल्वे मंत्र्यांनी तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी महंमद बय्यास यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world