India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बहुप्रतीक्षित सामना रविवारी (23 फेब्रुवारी) झाला. दुबईत झालेल्या या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 विकेट्सनं सहज पराभव केला. या मॅचमध्ये सर्व देशाच्या आशा विराट कोहलीवर (Virat Kohli) होत्या. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराटनं मॅचची सूत्रं हाती घेतली. टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब करुनच तो परतला या खेळीनं फॅन्स खुश झाले आहेत. सोशल मीडिया युझर्स आणि फॅन्स या खेळीची जोरदार प्रशंसा करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशभरातील फॅन्स, सर्व सेलिब्रेटींनी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. फिल्मफेयरनं देखील विराट कोहलीच्या अभिनंदनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.. सुपरस्टार रजनीकांतच्या चित्रपटाचा एक सीन या व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये रजनीकांतच्या अॅक्शन सीनची तुलना विराटच्या खेळीशी करण्यात आली आहे. या सीनमध्ये जवळपास 10-11 गुंड हातामध्ये तलवार घेऊन रजनीकांवर हल्ला करतात. पण, थलायवा त्यांच्या एकाच हत्यारानं सर्वांना लोळवतात. रजनीकांतनं एकापाठोपाठ लगावलेल्या ठोशांची कल्पना विराटच्या फटकेबाजीशी करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला विराट कोहली आणि रजनीकांत या दोन सुपरस्टार्सची करण्यात आलेली तुलना आवडली आहे.
दुबईत रविवारी झालेल्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले 242 रन्सचं आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केले. विराट प्रमाणेच शुबमन गिल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांनीही या विजयात मोलाचं योगदान दिलं.