Viral Methi Video : सोशल मीडियावर एका महिलेने भारतातील १० रुपयांच्या मेथीची तुलना अमेरिकेतली ६०० रुपयांना मिळणाऱ्या मेथीशी केली आहे. यामुळे इंटरनेटवर 'महाभारत' सुरू झालं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये 'मेथी' खरेदी करताना दिसत आहे. भारतात सहसा १० ते २० रुपयांना मिळणारी मेथीची एक जुडी अमेरिकेत तब्बल ७ डॉलर्सना (सुमारे ५८० ते ६०० रुपये) मिळत असल्याचं तिने दाखवलं. किमतीतील ही तफावत पाहून महिलेने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
तिच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर घमासान सुरू झालं आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक भारतीयांनी म्हटलं आहे की, भारतात ताज्या भाज्या स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात. जे अमेरिकेसारख्या देशात शक्य नाही. भारताचे 'लो-कॉस्ट' राहणीमान हे मध्यमवर्गीयांसाठी वरदान असल्याचं म्हटलं जात आहे.
तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, अमेरिकेतील उत्पन्न हे डॉलरमध्ये असते. त्यामुळे तिथल्या लोकांसाठी ती किंमत त्यांच्या पगाराच्या मानाने जास्त नसते. तसेच, तिथे पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि साठवणुकीचा खर्च जास्त असतो. काही युजर्सनी असंही मत मांडलं की, जरी अमेरिकेत भाज्या महाग असल्या, तरी तिथल्या इतर सुविधा आणि तिथली क्रयशक्ती भारतापेक्षा वेगळी आहे.
(वरील माहिती सोशल मीडियावर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. )