Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!

Australian Woman Praised Uber Driver Video :  सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन महिलेनं भारतीय कॅब ड्रायव्हरचं खूप कौतुक केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Australian Woman Viral Video
मुंबई:

Australian Woman Praised Uber Driver Video :  सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन महिलेनं भारतीय कॅब ड्रायव्हरचं खूप कौतुक केलं आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ फक्त एका प्रवासाचा नाही, तर भारतीय व्यक्तीने ज्याप्रकारे एका परदेशी महिलेचा पाहुणचार केला, ते पाहून सर्वांची मान अभिमानाने नक्कीच उंचावेल. ऑस्ट्रेलियाची पॉडकास्टर आणि ट्रॅव्हलर ब्री स्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने म्हटलंय की, मुंबईत एका उबर ड्रायव्हरने ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर कशाप्रकारे तिची मदत केली...

ड्रायव्हरने दाखवलं माणुसकीचं उत्तम उदाहरण

व्हिडीओत ब्री स्टील म्हणते की, भारतात उबर ड्रायव्हर भविष्यातील आयकॉन आहेत. छटपूजेमुळं मुंबईच्या रस्त्यावर मोठं ट्रॅफिक होतं. 15 मिनिटांचा प्रवास 2 तासांत पूर्ण झाला. पण ड्रायव्हरने संयम ठेवला. त्याने पिण्यासाठी पाणी, कबाब आणि एक सॉफ्ट ड्रिंक्सही आणली. तसच तो पैसेही घेत नव्हता. हा नजारा पाहून ब्री स्टील खूप भावनिक झाली होती.

नक्की वाचा >> जॅकी श्रॉफच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये टायटॅनिक स्पॉट, थिएटर, 700 झाडे अन्..नजारा पाहून फराह खानही झाली थक्क

मुंबईचे उबर ड्रायव्हरच खरे जंटलमेन

ब्री ने म्हटलं की, असा अनुभव तिने पहिल्यांदाच घेतला नाही. याआधीही अनेक चालकांनी मदत केल्याचं तिनं म्हटलं आहे. कोण पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं, तर कोणी खाली पडलेले बुट उचलून दिले. त्यांनी म्हटलं की, भारतात ड्रायव्हर फक्त ड्रायव्हरच नाही, तर ते खरे हिरो आहेत, जे हृदय जिंकतात. व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसच या व्हिडीओला हजारो लोकांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका यूजरने मजेशीर अंदाजात म्हटलंय की, आता तर बॉलिवूडची पुढची जोडी उबरनेच बनवली. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, आम्ही भारतीय पाहुण्यांना देव मानतो. अतिथी देवो भव:..

नक्की वाचा >> RRB Jobs 2025 : रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख

Advertisement

Topics mentioned in this article