जाहिरात

RRB Jobs 2025 : रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख

RRB JE Recruitment 2025 : रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहात असाल, तर तुमच्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ज्यूनिअर इंजीनिअरच्या 2500 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

RRB Jobs 2025 : रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख
RRB Jobs 2025
मुंबई:

RRB JE Recruitment 2025 : रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहात असाल, तर तुमच्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ज्यूनिअर इंजीनिअरच्या 2500 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार यासाठी पात्र आहेत, ते आज 31 ऑक्टोबरपासून अर्ज भरू शकतात. आरआरबीने अर्जाची लिंक ऑफिशियल वेबसाईट www.rrbapply.gov.in खुली केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. तसच 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्जाचं शुक्ल भरू शकता. जे लोक इंजीनिअर फिल्डमधील आहे आणि सरकारी नोकरीसाठी अभ्यासही करत आहेत, त्यांनी या बंपर भरतीची संधी गमावू नये.

या रेल्वे भरतीसाठी पात्रता काय?

रेल्वेच्या या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयाचं किंवा इन्स्टिट्यूटचं सिव्हिल,मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्यूनिकेशनमध्ये ड्रिग्री किंवा डिप्लोमाचं प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. डिपो मेटेरियल सुपरिटेंडेटसाठी डिप्लोमा किंवा डिप्लोमा इंजीनिअरिंग विभागाशी निगडीत असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात.

नक्की वाचा >> दोघांनी केला सुशांत सिंह राजपूतचा मर्डर? बहिणीने केला खळबळजनक खुलासा, रिया चक्रवर्तीही निशाण्यावर..

कसं करणार अप्लाय?

या रेल्वे भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर www.rrbapply.gov.in वर जावं लागेल.जर तुम्ही आधी आरबीआयचा फॉर्म अप्लाय केला नसेल, तेव्हा बेसिक डिटेल्सच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनचं प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर प्राप्त झालेल्या नंबरने लॉग ईन करा. आता या संबंधीत भरतीच्या लिंकवर जाऊन फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण करा. तुमचं नाव, जन्मदिनांक, आई-वडिलांचं नाव, पत्ता आणि अन्य महत्त्वाची माहिती अचूकपणे भरा. सर्व बॉक्स भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा. तुमच्या कॅटेगरीनुसार, अर्जाचं शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंट घेऊन ती सुरक्षीत ठेवा.

नक्की वाचा >> Video: पालकांनो! आत्ताच अलर्ट व्हा..डायपर घातल्याने मुलांची किडनी खराब होते? चाईल्ड स्पेशलिस्टने जे सांगितलं..

एससी,एसटी, एक्स सर्व्हिसमेन, पीडब्ल्यूबीडी, महिला ट्रान्सजेंडर, मायनोरिटीज आणि इकॉनोमिकल बॅकवर्ड क्लास (EBC) च्या उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावं लागेल. याशिवाय अन्य उमेदवारांना 500 रुपये शुल्क द्यावं लागेल. सीबीटी 1 क्लिअर केल्यानंतर या उमेदवारांना 400 रुपये रिफंड केले जातील. तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना सर्व पैसे रिफंड केले जातील. याबाबतीत उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास, आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com