Jackie Shroff Farm House Video : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफला झाडे-रोपट्यांबाबत किती प्रेम आहे, हे तर सर्वश्रूत आहे. ते नेहमीच क्लीन आणि ग्रीन इंडियाचा स्लोगनही देतात. जॅकी श्रॉफ त्यांच्या घरीही ग्रीनरी आणि पॉजिटिव्ह परिस्थिती निर्माण करतात. त्यांचा निसर्गरम्य वातावरणात लपलेला एक सुंदर फार्महाऊस मुंबई-पुण्याच्या मध्यावर्ती आहे. हा फर्महाऊस जवळपास 44000 स्क्वेअर फूटमध्ये पसरला आहे. या जागेची खासीयत ही आहे की, इथे जवळपास 700 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये गुलाबासह अनेक सुंदर आणि देखण्या फुलझाडांचाही समावेश आहे. याला ग्रीन फार्महाऊसही म्हटलं जातं. जॅकी श्रॉफच्या फार्महाऊसची खासीयत काय आहे? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
जकी श्रॉफचा फार्म हाऊस पाहून फराह खानाही झाली थक्क
फर्ह खान तिचा कुक दिलीपसोबत या फार्महाऊसवर नुकतीच गेली होती. तिथे गेल्यावर दिलीपने मजेशीर कमेंट करत म्हटलं की, त्यांनाही अशाप्रकारचा फार्महाऊस खरेदी करून द्या. त्यांनाही शेती करायची आहे. यादरम्यान जॅकी श्रॉफने त्यांना संपूर्ण फार्महाऊस दाखवला. जॅकी श्रॉफ या फार्महाऊसमध्ये फिशिंगचा व्यवसायही करतात. त्यांच्या फार्महाऊसमध्ये कोंबड्या आणि बदकही आहेत. यामुळे संपूर्ण माहोल एका गावासारखाच वाटतो. झीलच्या जवळ एक स्विमिंग पूल आहे आि जॅकूजीही बनवण्यात आलं आहे. जे एकदम लक्झरी वाईब देतं.
नक्की वाचा >> RRB Jobs 2025 : रेल्वेत सर्वात मोठी भरती! 2500 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, 'ही' आहे शेवटची तारीख
फार्महाऊसमध्ये 700 प्रकारची झाडे
या फार्महाऊसची सर्वात मोठी खासीयत आहे की, इथे 700 वेगवेगळ्या जातींची झाडे लावण्यात आली आहेत. कदमा झाडाबाबत सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाले, हे झाड त्यांनी 12 वर्षांपूर्वी लावलं होतं. आईच्या आठवणीत हे झाड लावण्यात आलंय. या झाडाचं धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्वही आहे. फार्महाऊसच्या वैशिष्ट्यांबाबत म्हणायचं झालं तर इथे एम्पीथिएटरही आहे. या थिएटरमध्ये बसून म्यूझिक, डॉक्युमेंट्री आणि सिनेमा पाहू शकतो. इथे एक टायटॅनिक पॉईंटही आहे. जिथे लोखंडाचा एक स्टेज बनवण्यात आला आहे. इथे देशी अंदाजात किचन बनवण्यात आला आहे. जॅकी श्रॉफ यांच्या फार्महाऊसमध्ये अनेक प्रकारच्या सोयी सुविधाही उपलब्ध आहेत. या फार्महाऊसला पाहिल्यावर अनेकांना वाटतंय की, जॅकी श्रॉफला शहरातील जीवनशैली पेक्षा निसर्गरम्य वातावरणात राहायला आवडतं.
नक्की वाचा >> दोघांनी केला सुशांत सिंह राजपूतचा मर्डर? बहिणीने केला खळबळजनक खुलासा, रिया चक्रवर्तीही निशाण्यावर..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world