Phd विद्यार्थ्याची 9 ते 5 नोकरी, रात्री 11 नंतर बाईक टॅक्सी ड्रायव्हर; तरुणाची दिनचर्या पाहून थक्क व्हाल!

दीपक पांडे याची धावपळीची दिनचर्या पाहून इंटरनेटवरील लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे, तर काहींनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Inspiring Story : सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या तरुणाने आपल्या व्यस्त दिनचर्येची माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील ९ ते ५ ची पूर्णवेळ नोकरी, रात्री उशिरापर्यंत बाईक-टॅक्सी चालवणे, पीएचडीचं संशोधन, स्वतःचं जेवण बनवणं आणि व्हिडिओ एडिटिंग व कंटेंट क्रिएशन अशी दीपक पांडे याची धावपळीची दिनचर्या पाहून इंटरनेटवरील लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे, तर काहींनी त्यांच्या आरोग्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

इतकं काम करुनही पूर्वीपेक्षा जास्त समाधानी...

इन्स्टाग्रामवरील एका व्हायरल व्हिडिओमध्ये दीपक पांडे याने सांगितलं की, स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम केल्यावर त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एक काळ असा होता जेव्हा तो त्याची ९ ते ५ ची नेहमीची नोकरी संपवून घरी यायचा. तेव्हा त्यांना खूप थकल्यासारखं, निरुत्साही वाटायचं. मात्र, आज तो संध्याकाळी बाईक-टॅक्सी चालवतो. PhD चा अभ्यास करतो, स्वतःचं जेवण स्वतः बनवतो आणि डिजिटल कंटेंट देखील तयार करतो. एवढं सगळं करूनही तो पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आणि आनंदी आहे.

Advertisement

नक्की वाचा - 'भांडी घासण्यापेक्षा रिक्षा चालवणं...'; महिला रिक्षाचालकाचे विचार लाखोंच्या मला भिडले, पुढे तर म्हणाली...

दीपक याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा आला, जेव्हा त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ देण बंद केलं. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची काळजी आणि काहीतरी नवीन करण्याचा धोका, या सर्व गोष्टींमुळे ते अनेक वर्षे एकाच ठिकाणी अडकून पडले होते. शेवटी त्यांनी या भीतीवर मात करत पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. बाईक-टॅक्सी चालक म्हणून 'सॉईड हसल'अर्धवेळ काम सुरू केलं आणि ऑनलाइन व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ही सर्व कामं करीत असताना त्याच्या लक्षात आलं की, तो त्याच्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त गोष्टी करू शकतो. यासंदर्भातील व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. 

मेहनती तरुणाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल...

दीपकने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय, ९ ते ५ च्या नोकरीनंतर येणारा थकवा हा बऱ्याचदा फक्त एक बहाणा असतो. जेव्हा तुमची स्वप्नं मोठी असतात, तेव्हा रात्री ११ वाजताही तुमचे पाय थकत नाहीत, उलट ते अ‍ॅक्सिलेटर आणखी जोराने दाबतात. ऑफिस, बाईक-टॅक्सी, स्वयंपाक आणि पीएचडी... ही माझी कथा आहे. तुमचा बहाणा काय आहे? तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि आजच सुरुवात करा."

Topics mentioned in this article