आईचा मृतदेह घरात ठेवला! मुलानं 3 वर्ष घेतला पेन्शनचा लाभ, केलं असं काही..सरकारी कर्मचारीही झाले थक्क

एखादा व्यक्ती आपल्या आईवर इतकं प्रेम करतो की तिच्या मृत्यूनंतरही तिला विसरू शकत नाही. पण जर कोणी आईचा मृत्यू लपवून, तिच्यासारखा मेकअप करून, तेच कपडे घालून सरकारी कार्यालयात पोहोचला तर? धक्कादायक कहाणी वाचाच..

जाहिरात
Read Time: 3 mins
Today Shocking Viral News
मुंबई:

Dead Mother Pension Scheme Viral News : एखादा व्यक्ती आपल्या आईवर इतकं प्रेम करतो की तिच्या मृत्यूनंतरही तिला विसरू शकत नाही. पण जर कोणी आईचा मृत्यू लपवून, तिच्यासारखा मेकअप करून, तेच कपडे घालून सरकारी कार्यालयात पोहोचला तर? ही एखाद्या चित्रपटाची कथा आहे की काय? असं अनेकांना वाटेल. पण इटलीमध्ये अशाप्रकारची घटना सत्यात उतरली आहे. इटलीमध्ये 56 वर्षांच्या एका बेरोजगार व्यक्तीने फक्त आईचा मृत्यू लपवला नाही, तर तिचा मृतदेहही घरात ठेवला आणि तीन वर्षे पेन्शनचा लाभ घेतला. पण जेव्हा तो नवीन ओळखपत्र बनवण्यासाठी आईच्या वेशात सरकारी कार्यालयात पोहोचला, तेव्हा या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आणि नंतर जे घडलं, ते एखाद्या क्राइम-थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं.

3 वर्षांपूर्वी आईचा मृत्यू, पण मुलाने कोणालाच सांगितलं नाही

इटलीतील मंटुआ येथे राहणाऱ्या ग्रेजिएला ड'ओग्लियो यांचा मृत्यू सुमारे तीन वर्षांपूर्वी 82 व्या वर्षी झाला होता, पण त्यांच्या मुलाने मृत्यूची माहिती दिली नाही. एवढंच नाही, त्याने आपल्या आईचा मृतदेह चादरीत गुंडाळून स्लीपिंग बॅगमध्ये भरला आणि घरातील वॉशिंग रूममध्ये लपवून ठेवला. का? जेणेकरून पेन्शन सुरू राहील.

मिररच्या अहवालानुसार, त्या व्यक्तीने आपल्या आईसारखा लांब स्कर्ट, लिपस्टिक, फाउंडेशन, कानातले, हार आणि जुन्या पद्धतीचा ब्लाउज घालून बोरगो विरगिलियो येथील सरकारी कार्यालयात हजेरी लावली. स्थानिक वृत्तपत्राने याला ‘Real-life Mrs. Doubtfire transformation' असे संबोधले. पण समस्या आली... त्याची बोलण्याची शैली आणि शरीरयष्टीने त्याचा भेद उघड केला.

नक्की वाचा >> Delhi Blast: अफागाणिस्तानमध्ये BF तर भाऊ पाकिस्तानात! 'या' महिलेकडे सापडले 'पाकिस्तानी आर्मी'अधिकाऱ्यांचे नंबर

कर्मचाऱ्याने पाहिलं अन् त्यानंतर जे घडलं..

कर्मचाऱ्याने लक्षात घेतले की त्याचा आवाज पुरषांसारखा होता. मान खूप जाड दिसत होती आणि हातांची त्वचा 85 वर्षांच्या महिलेप्रमाणे अजिबात नव्हती. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला लगेचच संशय आला. कर्मचाऱ्याने तात्काळ पोलीस आणि महापौरांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी खरी ड'ओग्लियो यांचे जुने फोटो काढले, मुलाच्या ओळखीशी जुळवले आणि सत्य समोर आले. ती ‘महिला' प्रत्यक्षात आईचे कपडे घातलेला तिचा मुलगा होता.

Advertisement

घरी पोलीस पोहोचल्यावर मृतदेह सापडला

जेव्हा पोलिस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा सगळं आणखी भयानक निघालं. लॉन्ड्री रूममध्ये चादरी आणि स्लीपिंग बॅगमध्ये ममीसारखा सुकलेला मृतदेह सापडला. त्याला तात्काळ पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. आता त्या व्यक्तीवर मृतदेह लपवणे, सरकारी निधीची फसवणूक आणि बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या आरोपांवर चौकशी सुरू आहे.

नक्की वाचा >> 'या' एका अभिनेत्रीसोबत होतं बॉबी देओल आणि गोविंदाचं अफेअर, लग्न करायचं होतं, पण धर्मेंद्रने..

3 वर्षांत लाखोंची पेन्शन हडपली

रिपोर्टनुसार, तो दरवर्षी सुमारे 47000 पाउंड (भारतीय चलनात अंदाजे 49 लाख रुपये) पेन्शन घेत होता. एवढंच नाही, त्याच्याकडे तीन घरांची मालमत्ता देखील आढळली. महापौर फ्रांसेस्को अपोर्टी यांनी सांगितले की, जर त्या कर्मचाऱ्याने लक्ष दिले नसते, तर कदाचित तो हा खेळ अजून बराच काळ खेळला असता. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आईचा मृत्यू कदाचित नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा.

Advertisement