Bollywood Shocking News Today : बॉबी देओलने 1995 मध्ये ‘बरसात' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटामुळे बॉबी देओल प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे बॉबी देओलचा महिला चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात वाढला. फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बॉबी देओल अभिनेत्री नीलम कोठारीसोबत पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे बॉबीची फिल्मी करिअरपेक्षा नीलमसोबतच्या अफेरबाबतच्या चर्चा जास्त रंगल्या होत्या. पण काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तसच त्यांचे अनेक किस्सेही समोर आले.
नीलम कोठारी या 1990 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे चाहत्यांना त्यांचं वेड लागलं होतं. त्यांनी 1984 मध्ये ‘जवानी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. पण गोविंदासोबत केलेल्या 'इल्जाम' या चित्रपटामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली. बॉबी आणि नीलम पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर दोघांचं नातं तुटलं, धर्मेंद्रमुळे हे सर्व घडलं, असं काही लोकांना वाटलं होतं. तर काहींनी म्हटलं होतं की, बॉबीचा पूजा भट्टसोबतचा अफेअर यासाठी कारणीभूत होता.
नक्की वाचा >> लग्न मोडलं की पुढे ढकललं? चर्चांनंतर स्मृती मंधाना-पलाशने इन्स्टाग्रामवर केला 'SAME' बदल, तुम्ही पाहिला का?
नीलम कोठारी मुलाखतीत नेमकं काय म्हणाल्या होत्या?
स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत नीलम कोठारी यांनी बॉबी देओलसोबतच्या पूर्वीच्या नात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या होत्या. तसत त्यांनी नात्यात दुरावा का निर्माण झाला, यामागची कारणेही सांगितली होती. ब्रेकअपसाठी धर्मेंद्र जबाबदार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत नीलम यांनी वेगळाच खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की ती अशा व्यक्तीशी लग्न करण्याबाबत विचार करत होती, ज्याने आपले करिअरही त्यावेळी सुरू केले नव्हते.
"शेवटी मी एक स्टार-वाइफ बनेल आणि.."
नीलम म्हणाल्या, “खरं सांगायचं तर, या निर्णयाचा कोणत्याही कुटुंबाशी काहीही संबंध नाही. मी फक्त हेच विचार करत होते की शेवटी मी एक स्टार-वाइफ बनेल आणि हा विचार मला इतका त्रास देत होता की मला अस्वस्थ वाटू लागले. पुढे त्या म्हणाल्या, तुम्हाला माहितीच आहे, अशा मुलासोबत नातं जोडण्याचा विचार जो चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे, त्याने तर अजून सुरुवातही केलेली नाही. मला फक्त भीती वाटत होती. खूप भीती वाटत होती. मी ती भीती व्यक्तही करू शकत नव्हते, मी ठरवलं, आत्ताच हे संपवावं. मला असं वाटत होतं की नंतर काही चूक झाली तर खूप उशीर झालेला असेल. मी माझ्या आजूबाजूला, सगळ्या स्टार-वाइव्ह्जसोबत असं होताना पाहत होते. ठीक आहे, मी उशिरा, खूप उशिरा निर्णय घेतला, हे मी मान्य करते. पण तरीही, खूप उशीर झाला नव्हता.”
जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की 90 च्या दशकात गोविंदा आणि नीलम यांचा अफेअर खूप चर्चेत होता. दोघांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या केमिस्ट्रीने सगळ्यांची मने जिंकली. सुरुवातीला दोघे मित्र होते, पण नंतर ते प्रेमात पडले. त्या वेळी गोविंदाची त्याची सध्याची पत्नी सुनीताशी साखरपुडा झाला होता आणि नीलमसोबतच्या नात्याला मोठा धक्का बसला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world