जाहिरात

Delhi Blast: अफागाणिस्तानमध्ये BF तर भाऊ पाकिस्तानात! 'या' महिलेकडे सापडले 'पाकिस्तानी आर्मी'अधिकाऱ्यांचे नंबर

छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या बोगस आयएएस अधिकाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासादरम्यान, एका महिलेकडे 10 आंतरराष्ट्रीय फोन नंबर मिळाले आहेत.

Delhi Blast: अफागाणिस्तानमध्ये BF तर भाऊ पाकिस्तानात! 'या' महिलेकडे सापडले 'पाकिस्तानी आर्मी'अधिकाऱ्यांचे नंबर
Delhi Bomb blast latest News
मुंबई:

मोसिन शेख, प्रतिनिधी

Today Shocking News :  छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या बोगस आयएएस अधिकाऱ्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासादरम्यान, एका महिलेकडे 10 आंतरराष्ट्रीय फोन नंबर मिळाले आहेत. कल्पना भागवत असं या महिलेचं नाव असून पोलिसांना तिच्या विरोधात गंभीर पुरावे सापडले आहेत.अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील नंबर्सचा यात समावेश आहे. दरम्यान, या महिलेचा दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कल्पना भागवतची पोलीस कोठडी संपल्याने तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलीस आणि सरकारी वकिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कल्पनाच्या घरात 19 कोटी रुपयांचा धनादेश (Cheque) आणि आणखी एक 6 लाख रुपयांचा चेक सापडला आहे.या महिलेनं  गेल्या काही महिन्यांत राजस्थान,जोधपूर आणि दिल्ली येथे सतत विमानाने प्रवास केल्याचं उघडकीस आलं आहे.

नक्की वाचा >> लग्न मोडलं की पुढे ढकललं? चर्चांनंतर स्मृती मंधाना-पलाशने इन्स्टाग्रामवर केला 'SAME' बदल, तुम्ही पाहिला का?

पोलीस तपासात धक्कादायक गोष्टी आल्या समोर

तसच पोलिसांच्या तपासात आणखी काही संशयास्पद गोष्टीही समोर आल्या आहेत.या महिलेच्या मोबाईलमध्ये "Home Minister OSD" या नावाने सेव्ह केलेला नंबर सापडला आहे.पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्यांचे नंबरदेखील या महिलेकडे सापडले आहेत.अशी माहिती पोलिसांनी न्यायलयात दिली आहेत. त्यामुळे या महिलेचा दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाशी काही संबंध आहे का?याचाही तपास सुरु असल्याचं पोलिसांनी न्यायालयात म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> Kalyan News : शाळेला दांडी मारून अंधारात 8 अल्पवयीन मुला-मुलींचा सुरु होता 'तो' खेळ, पोलिसांनी धाड टाकताच..

महिलेनं व्हाट्सअॅप चॅट डिलीट केली अन् पुढे..

कल्पना भागवतचा बॉयफ्रेंड अफगाणिस्तानमध्ये राहत असून त्याचा भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो.या दोघांकडून कल्पना भागवतच्या खात्यावर मोठी रक्कम जमा करण्यात आली आहे.पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या व्यक्तीसोबत या महिलेनं व्हाट्सअॅप चॅट केल्याचे पुरावे समोर आले आहेत. परंतु, कल्पनाने चॅट डिलिट केलं आहे. कल्पनाकडे आर्मी कॅन्टोनमेंट बोर्डचा नंबर आहे.तसेच अफगाणिस्तानच्या दूतावासाचा नंबरही आहे.त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे असू शकते, असा संशय पोलिसांना आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com