
विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapuri Chappal controversy : राज्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. अंबाबाई मंदिरामुळे हे शहर सर्वांचंच श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर तांबाडा-पांढरा रस्सा, मिसळ, कुस्ती, फुटबॉलचं प्रेम या साऱ्या गोष्टीत कोल्हापूरच्या 'जगात भारी' म्हणून ओळखल्या जातात. कोल्हापूरची आणखी एक ओळख म्हणजे कोल्हापुरी चप्पल! सामान्यांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत सर्वांनाच याची भूरळ आहे. अगदी चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. सध्या सोशल मीडियावर 'कोल्हापुरी चप्पल' हा विषय ट्रेंडिंग आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स या विषयावर एका परदेशी कंपन्यांवर संतापले आहेत. हे प्रकरण काय आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
इटलीचा लग्झरी फॅशन ब्रँड 'प्राडा'च्या नव्या कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्राडाने नुकतेच मिलानमध्ये आपले Men's Spring/Summer 2026 कलेक्शन सादर केलं. या शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जी चप्पल दिसली, ते अगदी भारतातील प्रसिद्ध 'कोल्हापुरी चप्पल'सारखी होती.
या चप्पलांची किंमत जवळपास 1 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय. तर भारतात अशीच चप्पल सुमारे 400 ते 500 रुपयाला सहज मिळते. भारतीय आणि विशेषता एक महाराष्ट्रीयन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलीची कोल्हापूरची नाळ तोडली जाऊ नये अशी भावना व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )
सोशल मीडियावर राडा!
कोल्हापुरी चप्पल्सना जिओग्राफिकल टॅगिंग नाही का? कुणीही ही डिझाईन घेऊन हजारोंमध्ये विकू शकतो का? असा संतप्त प्रश्न काही युझर्सनी विचारला आहे. त्याचबरोबर 'आपण आपल्या संस्कृतीचा सन्मान केला नाही, तर कोणी तरी दुसरं करेल. प्राडा आता कोल्हापुरी चप्पल शेकडो डॉलरमध्ये विकते आहे, पण आपल्या कारागिरांना ना क्रेडिट मिळतंय, ना योग्य मोबदला.' अशी भावना काही युझर्सनी व्यक्त केली आहे.
Prada is selling Kohlapuri Chappal for 1.2 Lakh
— Woke Eminent (@WokePandemic) June 25, 2025
Prada's ₹1.2 lakh Kolhapuri chappals are a shameless cash grab. These handcrafted chappals a Maharashtra legacy for centuries sell for ₹300-₹1500 in Kolhapur's markets.
Yet, Prada slaps on a logo, calls them “leather sandals,”… pic.twitter.com/qkwRoEFRst
@Prada You've taken our Kolhapuri footwear, but not even mentioned Kolhapuri chappal. For generations, we've poured our soul into this craft it's not just footwear, it's our identity. Give us the respect we deserve, or stop stealing our art please pic.twitter.com/Ghevd3L7i2
— बघा आबा ॲाफिशेल (@Bagha_aaba) June 24, 2025
PRADA is selling Kolhapuri chappals for ₹1.2 lakh — a design stolen from the Chamar community of India, who've handcrafted them for generations. No credit. No acknowledgment. Just pure cultural theft dressed in luxury branding. Shameful. #CulturalTheft #Kolhapuri pic.twitter.com/l3ITZlGSEG
— The Dalit Voice (@ambedkariteIND) June 25, 2025
They say if you don't value your culture, someone else will and that's exactly what's happening. Prada is now selling Kolhapuri chappals for hundreds of dollars, while our artisans, who've kept this craft alive for generations, get no credit or fair pay.🙃 pic.twitter.com/kbVlsk2nY0
— 𝙷𝚊𝚛𝚛𝚢 𝚂𝚝𝚢𝚕𝚎𝚜 ✿◠‿◠) 🎀 (@VanshikaInStyle) June 23, 2025
कोल्हापूरकर काय म्हणतात?
कोल्हापुरी चप्पल व्यावसायिक मारुती गवळी यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, 'आम्ही सोशल मीडियावर पाहिलं की प्राडा कंपनीने चप्पलच ब्रॅण्डिंग केलं. आमचा व्यवसाय मुळातच धोक्यात आहे. अशात आता एखादी परदेशी कंपनी आमचं चप्पल त्यांच्या नावाने खपवणार असेल तर हे चुकीच आहे. मी एक व्यावसायिक आहे माझं स्वतःचं जीआय मानांकन सर्टिफिकेट आहे. आणि जर एखाद्या बाहेरच्या कंपन्या जर अशा चपला विकणार असतील तर या जीआय मानांकनाचा काय उपयोग. कोल्हापूरचा चप्पल हे कोल्हापुरी म्हणूनच टिकलं पाहिजे अशीच आमची माफक अपेक्षा आहे.'
चप्पल खरेदी करण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांनी देखील या सर्व प्रकारावर बोलताना हे कोल्हापुरी चप्पल आमची शान आहे अशी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरचा ब्रँड हा टिकलाच पाहिजे आणि त्यासाठी सरकारने. प्रयत्न करायला हवेत. कोल्हापूरचे दागिने जसे प्रसिद्ध आहेत तशीच कोल्हापुरी चप्पल देखील प्रसिद्ध आहे. कुठलीही बाहेरची कंपनी येऊन हे चप्पल आमचा आहे असं सांगत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा तीव्र प्रतिक्रिया ग्राहक आणि सामान्य वर्गातून आहेत.
कोल्हापूरच्या कारागिरांनी या सर्व प्रकारानंतर बोलताना वडिलोपार्जित व्यवसाय टिकला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर चप्पलसाठी हजारो कारागीर कार्यरत आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह या कोल्हापुरी चपलेवर आहे. कोल्हापुरी चप्पल बसवण्याचा बनवण्यासाठी तासनतास एकाच जागी बसावं लागतं. येणाऱ्या पिढीमध्ये ही कला रुजवणं गरजेचं आहे. एखादी चप्पल बनवताना त्याला आकर्षक अशी डिझाईन करावी लागते.
या शोमध्ये एकूण 56 डिझाईन्सपैकी 4 लुक्समध्ये या चप्पल दिसल्या. शोच्या आमंत्रणाबरोबर एक लेदर रिंग गिफ्ट म्हणून देण्यात आली होती, जिला काही फॅशन एक्सपर्ट्सनी कोल्हापुरी चप्पलमध्ये वापरली जाणारी 'टो-रिंग'सारखी म्हटलं.
कोल्हापुरी चप्पल 12वी-13वी शतकापासून भारतात वापरात आहेत. कधी शेतकरी, तर कधी राजे यांच्याकडून वापरल्या गेलेल्या या चप्पल आजही बॉलिवूडपासून सामान्य लोकांपर्यंत खूप प्रसिद्ध आहे.
यापूर्वी एकदा भारतीय दुपट्ट्याला वेस्टर्न ब्रँड्सनी नवीन नाव देऊन सादर केल्याचा एक प्रकरण सांगितलं जातं. 'स्कॅंडिनेव्हियन स्कार्फ' असा हा दुपट्टा होता. या दुपट्ट्यानंतर आता कोल्हापुरी चप्पल हा विषय समोर आला आहे. कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरचीच राहावी अशा प्रतिक्रिया कोल्हापूरकरांमधून व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world