iPhone 17 : अरे, आवरा याला! iphone 17 ला नवरीप्रमाणे सजवून गृहप्रवेश, नंतर घटस्फोट; व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये एक तरुण आयफोन 17 नारंगीचा घरात एक नवरीप्रमाणे प्रवेश करतो. आयफोन 17 ला नवरीप्रमाणे सजवतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

नुकताच iphone 17 ची सीरिज दाखल झाली आहे. iphone 17 च्या खरेदीसाठी मोठी रांग लागली होती. दिल्ली आणि मुंबईत iphone 17 ची क्रेझ पाहता अनेकजण हैराण झाले. यंदाचा iphone 17 मॅक्स प्रो हा त्याच्या नारंगी रंगामुळे अधिक चर्चेत आहे.  लोकांमध्ये आयफोन खरेदीसाठी अक्षरश: स्पर्धा लागली आहे. देशातील 70% लोकसंख्या दरवर्षी EMI वर आयफोन खरेदी करते. आता, एका वापरकर्त्याने केशरी रंगाचा आयफोन खरेदी केला आणि  त्याचा गृहप्रवेश केला. शेवटी त्याला घटस्फोटही दिलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. लोक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. 

नुकतच आयफोन 17 चे दोन वर्जन मार्केटमध्ये दाखल झाले. यंदा पहिल्यांदाच नारंगी रंगाचा आयफोन आला आहे. आयफोन 17 मॅक्स प्रो घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

नक्की वाचा - Panipuri Dispute: कहरच रे! फक्त 2 पाणीपुरीसाठी राडा; महिलेचा रस्त्यात ठिय्या, VIDEO पाहून डोकं धराल

व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा....

आयफोन 17 चा गृहप्रवेश  (iPhone 17 Orange Griha Pravesh Viral Video )

या व्हिडिओमध्ये एक तरुण आयफोन 17 नारंगी रंगाच्या फोनचा घरात एक नवरीप्रमाणे प्रवेश करतो. आयफोन 17 ला नवरीप्रमाणे सजवतो. तांदळाने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात आयफोन पाय ठेवून त्याचे घरात स्वागत केले जाते. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पॅडमॅन चित्रपटातील "आज से तेरी सारी दुनिया मेरी हो गई" हे गाणे मागे वाजत आहे. त्यानंतर तो तरुण आयफोन 17 घरात आणतो आणि शेवटी एक धक्कादायक ट्विस्ट येतो. शेवटी, घटस्फोटाची नोटीस येते आणि त्यावर आयफोन 17 ठेवला जातो.