जाहिरात

Panipuri Dispute: कहरच रे! फक्त 2 पाणीपुरीसाठी राडा; महिलेचा रस्त्यात ठिय्या, VIDEO पाहून डोकं धराल

Vadodara Woman Sit On Road And Started Crying For Panipuri Viral Video: दोन पाणीपुरी कमी दिल्या म्हणून भररस्त्यात ढसाढसा रडून ट्रॅफिक जाम केले असं सांगितलं तर कुणालाही खरे वाटणार नाही. मात्र गुजरातमधील एका महिलेने पाणीपुरीसाठी असाच राडा  घातला आहे.

Panipuri Dispute: कहरच रे! फक्त 2 पाणीपुरीसाठी राडा; महिलेचा रस्त्यात ठिय्या, VIDEO पाहून डोकं धराल

Pani Puri Dispute Woman Protest Causes Traffic Jam Viral Video: पाणीपुरी म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय.. लहानांपासून, वृद्धांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते. तरुणींमध्ये पाणीपुरी प्रचंड लोकप्रिय आहे. पाणीपुरी खाण्यासाठी मुली कधीही नाही म्हणणार नाहीत, असं गमतीने म्हटलंही जाते. मात्र दोन पाणीपुरी कमी दिल्या म्हणून भररस्त्यात ढसाढसा रडून ट्रॅफिक जाम केले असं सांगितलं तर कुणालाही खरे वाटणार नाही. मात्र गुजरातमधील एका महिलेने पाणीपुरीसाठी असाच राडा  घातला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घ्या... 

पाणीपुरीवरुन हायहोल्टेज ड्रामा| Gujrat Pani Puri Dispute

गुजरातमधील वडोदरामध्ये (Gujrat Video) एक विचित्र घटना घडली ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. पाणीपुरी वाल्याने दोन पुरी कमी दिल्याने नाराज  झालेल्या महिलेने रस्त्यावर ठिय्या मांडला. २० रुपयांना सहा पुरी देण्याऐवजी तिला फक्त चार पुरी देण्यात आल्या. तिने त्या दुकानदाराला उर्वरित दोन पुरी देण्याचा आग्रह धरला. तिची मागणी पूर्ण न झाल्याने ती लहान मुलासारखी धरणे आंदोलनावर बसली. या महिलेच्या ठिय्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. 

महिलेचा भररस्त्यात ठिय्या| Women Protest Or Road For Panipuri 

वडोदरामधील (Vadodara) सुरसागर तलावाजवळ हा सगळा प्रकार घडला. महिलेने भररस्त्यात ठाण मांडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिलेला समजावले मात्र तरीही ती माघार घ्यायला तयार नव्हती.,रडत रडत तिने पोलिसांना सांगितले, "हा पाणीपुरी विक्रेता सर्वांना सहा पुरी देतो, पण त्याने मला दोन कमी दिल्या आहेत. मला आणखी दोन पुरी द्या नाहीतर त्याचे दुकान येथून काढून टाका" अशी थेट मागणी तिने पोलिसांकडे केली. 

तसेच तो मला दरवेळी कमी पुरी देतो. तो गुंडगिरीसारखा वागतो. तो सर्वांना २० रुपयांना सहा पुरी देतो, पण तो मला कमी देतो. तो प्रत्येक वेळी माझ्याशी भांडतो. फक्त त्याची गाडी थांबवा. मला त्याची गाडी इथे नको आहे, अशी तक्रारही तिने केली. जवळपास १ तास हा सगळा हायहोल्टेज ड्रामा सुरु होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर, पोलिसांना त्या महिलेला समजावण्यात आणि तिला सोबत घेऊन जाण्यात यश आले, त्यानंतरच रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर झाली. या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. या महिलेचे पाणीपुरी प्रेम अन् रस्त्यावर मांडलेला ठिय्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com