सीक्रेट सँटा नव्हे, हे तर सीक्रेट Swiggy, कोणी केली 1 लाख रुपयांच्या कंडोमची ऑर्डर? काय काय मागवलं? पाहा यादी

ऑनलाइन ग्रोसरी आणि इंस्टंट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy Instamart च्या वार्षिक रिपोर्टची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Swiggy Instamart Report 2025

Swiggy Orders Viral News : ऑनलाइन ग्रोसरी आणि इंस्टंट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy Instamart च्या वार्षिक रिपोर्टची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये भारतीयांनी केलेल्या खरेदीचं भन्नाट वास्तव या रिपोर्टच्या माध्यमातून उघडकीस आलंय. या रिपोर्टनुसार, चेन्नईतील एका ग्राहकाने संपूर्ण वर्षभरात फक्त कंडोमवर तब्बल ₹1,06,398 रुपये खर्च केले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

दर महिन्याला जवळपास 19 वेळा कंडोमची डिलिव्हरी

रिपोर्टनुसार, चेन्नईतील या ग्राहकाने कंडोमसाठी एकूण 228 वेगवेगळे ऑर्डर दिले.म्हणजे सरासरी दर महिन्याला जवळपास 19 वेळा कंडोम मागवले गेले. स्विगीने ही सर्व खरेदी मजेशीरपणे सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.स्विगीने याला प्लॅनिंग अहेड (planning ahead) म्हणजेच कशाप्रकारे पूर्वतयारी केली जात आहे, याचं उदाहरण म्हटलं आहे. रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, प्रत्येक 127 ऑर्डरपैकी एका ऑर्डरमध्ये कंडोमचा समावेश होता. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात कंडोमच्या विक्रीत 24% वाढ झाली.

नक्की वाचा >> रात्रीचे 11 वाजता..एकटी मुलगी अन् मुंबई लोकल, महिला खरंच सुरक्षित आहेत? 'या' व्हिडीओनं दाखवलं मायानगरीचं सत्य

खर्चाचे आकडे थक्क करणारे

Swiggy Instamart च्या अहवालात फक्त कंडोमच नाही, तर आणखी अनेक धक्कादायक खर्च उघड झाले आहेत. मुंबईतील एका युजरने रेड बुल शुगर फ्री (Red Bull Sugar Free) वर तब्बल ₹16.3 लाख खर्च केले. चेन्नईतील दुसऱ्या युजरने पेट सप्लायवर ₹2.41 लाख उडवले. नोएडातील एका युजरने एकाच वेळी ₹2.69 लाखांचे गॅजेट्स (ब्लूटूथ स्पीकर,SSD आणि रोबोटिक व्हॅक्यूम) खरेदी केले. तर हैदराबादमध्ये एका युजरने एका क्लिकमध्ये ₹4.3 लाखांचे तीन iPhone 17 ऑर्डर केले.

नक्की वाचा >> Leopard News: खतरनाक बिबट्या डोंगरावर पोहोचला! 'या' शहरावर आहे नजर, फोटो शेअर करत मुख्यमंत्री म्हणाले..

डिलिव्हरी पार्टनर्सची झाली चांदी

बेंगळुरूमधील एका युजरने वर्षभरात फक्त टिप्समध्ये ₹68,600 खर्च केले. त्यामुळे शहराला ‘भारताची टिपिंग कॅपिटल' म्हटले गेले. तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर राहिले, जिथे एका युजरने ₹59,505 टिप्स दिल्या. Swiggy Instamart च्या आकडेवारीनुसार, व्हॅलेंटाईन डेला दर मिनिटाला 666 गुलाबांचे ऑर्डर नोंदवले गेले. तसेच रक्षाबंधन, फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेंटाईन डे हे 2025 मधील सर्वाधिक गिफ्ट केले जाणारे दिवस ठरले.

Advertisement

डिजिटल इंडियाचे नवे चित्र

Swiggy Instamart चा हा अहवाल दाखवतो की आता भारतात लोक फक्त भाजीपाला आणि दूधच नाही, तर iPhone, एनर्जी ड्रिंक, पाळीव प्राण्यांचे सामान आणि लक्झरी प्रॉडक्ट्ससुद्धा काही मिनिटांत ऑनलाइन मागवत आहेत.