Women In Mumbai Local Video Viral : पनवेलजवळ एका मनोरुग्णाने शाळकरी मुलीला धावत्या लोकल ट्रेनमधून बाहेर फेकून दिल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांसोबत भयंकर घटना घडल्याचं अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता एका नव्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एका महिलेनं रात्रीच्या प्रवासाचा 25 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या महिला प्रवाशासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
महिलांसाठी रात्री प्रवास करणे आजही धोकादायक
महिलांसाठी रात्री प्रवास करणे आजही धोकादायक मानले जाते. पण काही शहरं अशी आहेत जिथे सुरक्षेबाबत चिंता करण्याची आवश्यकता भासत नाही. मुंबई हे असंच एक शहर आहे. एका महिलेनं स्वतःचा अनुभव X वर शेअर केला आहे. "मुंबई कधी झोपत नाही" हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नांबाबत ठोस उपायांचा अभाव असल्याचं अनेकदा समोर आलंय.
नक्की वाचा >> Viral Video : जिममध्ये किती किलो वजन उचलता? प्रसिद्ध बॉडीबिल्डरसोबत घडली सर्वात भयंकर घटना
एका महिलेनं व्हिडीओ शेअर करत असा अनुभव सांगितला आहे,जो मुंबईत महिलांची सुरक्षा किती मजबूत आहे, याचा पुरावा दर्शवतो. ही पोस्ट राधा नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यात ती प्रश्न उपस्थित करत म्हणते मुंबई इतकी खास का आहे? यावर ती उत्तर देत म्हणते, महिलांच्या सुरक्षेमुळे.
What makes #Mumbai so special? The no.1 thing here is the SAFETY it offers to its women.
— Radha✨ (@SheIsTheFire) December 23, 2025
It is 11 PM. A weekday. I am going home from one end of the city to another after meeting a relative, in a local train. The ladies compartment/ coach is almost full (you are never alone in… pic.twitter.com/UBnZgQuVpw
नक्की वाचा >> Leopard News: खतरनाक बिबट्या डोंगरावर पोहोचला! 'या' शहरावर आहे नजर, फोटो शेअर करत मुख्यमंत्री म्हणाले..
इथे पाहा मुंबई लोकल ट्रेनचा व्हायरल व्हिडीओ
राधा रात्री 11 वाजता नातेवाईकांना भेटून परत येत होती. पण भीतीऐवजी तिच्या चेहऱ्यावर शांतता होती कारण ती लोकल ट्रेनमध्ये होती,ज्यात लेडीज कंपार्टमेंट पूर्ण भरलेले होते. या दरम्यान कोचमध्ये एक पोलीस अधिकारीही होता.

त्यामुळे मुंबईत महिलांना कधीच एकटं वाटत नाही. असे अधिकारी प्रत्येक कोचमध्ये असतात, असं ती सागंते. 25 सेकंदांच्या या व्हिडिओत म्हटलंय की, रात्रीच्या प्रवासातही महिलांना मुंबईत एकटं वाटत नाहीत आणि त्या सुरक्षित राहू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world