Leopard Viral News : बिबट्या..हे थोडंजरी ऐकायला आलं, तर अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. कारण राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अशातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीतील अडिंगिरी हिल्सवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचे अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. या फोटोत पाहू शकता की, बिबट्या कडाक्याच्या उन्हात डोंगराच्या शिखरावरून शहराकडे पाहतो. बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बिबट्याची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. बिबट्याच्या सुंदर फोटोंनी इंटरनेटवर लोकांची मने जिंकली आहेत.
व्हायरल पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क
व्हायरल फोटोत दिसतंय की, एक बिबट्या उंच डोंगरावर बसून पायथ्याखाली वसलेल्या शहराकडे अशा नजरेने पाहतो. जणू एखादा राजा आपल्या राज्याची पाहणी करत आहे.हे फोटो गुवाहाटीच्या अडिंगिरी हिल्सची आहेत.पहिल्या फोटोत बिबट्या एका विशाल खडकावर बसलेला आहे आणि समोर पसरलेल्या गुवाहाटी शहराकडे पाहत आहे. दुसऱ्या फोटोत तो निवांत बसून हिवाळ्यातील उन्हाचा आनंद घेत आहे. तसच आकाशात पक्षीही उडताना दिसत आहेत.एका बाजूला दाट जंगल आणि खडक, तर दुसऱ्या बाजूला पसरत जाणारे काँक्रीटचे शहर. हा नजारा निसर्ग आणि शहरीकरण यांच्यातील दुवाच बनला आहे.
नक्की वाचा >> Viral Video : जिममध्ये किती किलो वजन उचलता? प्रसिद्ध बॉडीबिल्डरसोबत घडली सर्वात भयंकर घटना
A perfect shot, A sight to behold.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) December 24, 2025
A leopard soaking in the winter sun atop Adingiri Hills, overlooking Guwahati's rise. pic.twitter.com/E61jSL99qo
CM बिस्वा यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
हे फोटो शेअर करत बिस्वा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “एक परफेक्ट शॉट,एक पाहण्यासारखा नजारा.अडिंगिरीच्या टेकड्यांवर हिवाळ्यातील उन्हात ऊन खात आणि गुवाहाटीच्या उदयाकडे (विकासाकडे) पाहणारा एक बिबट्या." या फोटोंकडे पाहिल्यावर असं वाटतं की, ते ‘कॅमेरा ट्रॅप'मधून घेतलेले आहेत. बिबट्याचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले असून लोकांनी या फोटोंबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बिबट्याचे फोटो खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी बिबट्याबाबत भीतीही व्यक्त केली आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world