
Mother And Son Emotional Video : आई-वडील संसार प्रपंचाचा गाडा सुरळीत ठेवण्यासाठी आणि मुलांना चांगले संस्कार घडवण्यासाठी काबाडकष्ट करत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आई आणि लहान बाळाच्या एका व्हिडीओनं सर्वांनाच भावनिक धक्का दिला आहे. या व्हिडीओत पाहू शकता, एक महिला 8 तासांची ड्युटी करून घरी परतते. त्यानंतर दरवाजा उघडल्यावर आईला पाहून तान्ह बाळं रडू लागतं.हा क्षण इतका भावनिक आहे की, ज्याने हा व्हिडीओ पाहिला, त्याचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नसतील.
तान्ह्या बाळाचा भावनिक क्षण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
व्हिडीओत दिसत आहे की, बाळाची आई जशी घरी येते, त्याचदरम्यान रुममध्ये तिचं बाळ सोफ्यावर बसलेलं असतं. आई कामावरून घरी परतल्यावर तिच्या बाळाच्या डोळ्यात अश्रू येतं. बाळाचे डोळे पाणावलेले आई त्याच्या जवळ जाते. बाळाला पाहून आईचा आनंद द्विगुणीत होतो. लहान बाळही आईला पाहून भावुक होतो आणि त्यानंतर बाळाची आई त्याला कडेवर घेते. बाळाला जवळ घेतल्यावर आईचा थकवा गायबच झाल्यासारखं वाटतं. आई आणि तान्ह्या बाळाचा हा सुंदर व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ नोकरी करणाऱ्या प्रत्येक महिलेचं हृदय जिंकणारा आहे. कारण या व्हिडीओत आई-मुलाचं पवित्र नात्याची झलक दिसते, जे शब्दात सांगणं कठीण आहे.
नक्की वाचा >> वाह रे वाह! Google मध्ये नोकरी मिळाली, पोरानं आईला थेट अमेरिकेला नेलं अन् ऑफिसमध्ये..हृदयस्पर्शी Video पाहाच
इथे पाहा आई आणि बाळाचा भावनिक व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @shiwaniofficial नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 11 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि 62 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, इंटरनेटवर कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. एका यूजरने व्हिडीओला कमेंट करत म्हटलं, यावेळेची किंमत कोणीही ठरवू शकत नाहीत. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, प्रत्येक आईसाठी सर्वात मोठी सॅलरी त्या मुलाचं हसणं असतं. तर अन्य एका यूजरने म्हटलं, थकवा संपवण्याचा सर्वात प्रेमळ उपाय. हा व्हिडीओ फक्त आई-मुलाची कहाणी नाहीय, तर त्या प्रत्येक महिलेची एक झलक आहे जी आपल्या कुटुंबासाठी मेहनत करते. मोबदला म्हणून तिला फक्त एक गोड हास्य हवं असतं.
नक्की वाचा >> Video : 'अहो..संसार आहे की नाही',72 तासांची शिफ्ट करून रेल्वे कर्मचारी घरी परतला, बायकोनं नवऱ्याची शाळाच घेतली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world