जाहिरात

समुद्राच्या मधोमध आहे Island, पुरुषांना या बेटावर नो एन्ट्री! फक्त स्त्रियाच का जातात? लाखो लोकांना माहित नाही

या बेटावर पुरुषांना जाण्यास बंदी आहे. स्त्रिया या बेटावर का जातात? कारण वाचून थक्कच व्हाल.

समुद्राच्या मधोमध आहे Island, पुरुषांना या बेटावर नो एन्ट्री! फक्त स्त्रियाच का जातात? लाखो लोकांना माहित नाही
SuperShe Island Finland

Mysterious Island For Women : जगात अनेक अशी ठिकाणी आहेत, जिथे निसर्गरम्य वातावरणासह स्मशान शांतता असते.समुद्रात एक असंच बेट आहे, जिथे ना गोंधळ आहे ना दिखावा..निसर्ग सौंदर्याने फुललेलं हे ठिकाण फक्त शांत वातवरणासाठी प्रसिद्ध आहे. इथे कोणतेही पोस्टर्स नाहीत. कोणत्याही प्रकारचा गोंगाट नाही. पण येथील खासीयत वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या बेटावर पुरुषांना जाण्यास बंदी आहे.फिनलँडच्या किनाऱ्याजवळ, समुद्रांच्या लाटा आणि शांत,दाट जंगलांच्या मध्ये लपलेले हे बेट खूप खास आहे. यामागचं कारण म्हणजे, ही जागा त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना काही काळासाठी जगाच्या अपेक्षांपासून मोकळं होऊन फक्त स्वतःसोबत राहायचं आहे.

समुद्राच्या मध्यभागी एक अनोखं जग (A Hidden World in the Baltic Sea)

1) फिनलँडच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ,हेलसिंकीपासून जवळपास 100 किलोमीटर दूर बाल्टिक समुद्रात वसलेलं हे 
SuperShe Island पहिल्या नजरेत एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं वाटतं.

2) 8.4 एकर क्षेत्रफळात पसरलेलं हे खासगी बेट, खडकाळ किनारे, दाट जंगलं आणि मोकळं, निळं आकाश यांसोबत शांततेनं भरलेल्या एकांताची साथ देतं. 

3) इथे पोहोचणं सोपं असलं तरी येथील जीवनशैली नेहमीच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

नक्की वाचा >> BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..

  • जिथे पुरुषांना प्रवेश नाही (The Women-Only Rule)
  • SuperShe Island चा सर्वात मोठा आणि खास नियम म्हणजे इथे पुरुषांना प्रवेश नाही.
  • ही बंदी द्वेषातून नाही, तर फोकस आणि स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून आहे.
  • इथे येणाऱ्या महिलांचं म्हणणं आहे की कोणत्याही दडपणाशिवाय, त्या स्वतःला अधिक मुक्त, आरामशीर आणि नैसर्गिक अनुभव घेतात.
Latest and Breaking News on NDTV

या बेटाची खासीयत काय?  (Founded by Kristina Roth)

  • या अनोख्या बेटाची कल्पना माजी टेक-इंडस्ट्री CEO क्रिस्टिना रोथ यांनी केली. फिनलंडच्या नैसर्गिक सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांनी अशी जागा निर्माण केली, जिथे स्त्रिया स्वतःशी पुन्हा नातं जोडू शकतील. येथील प्रत्येक गोष्ट दिखाव्यापासून दूर आणि भावनिक शांततेच्या अधिक जवळ आहे.इथे एकावेळी फक्त आठ महिलांचाच इथे राहू शकतात.  
  • योग, ध्यानधारणा, जंगलातील फेरफटका, कयाकिंग आणि पारंपरिक फिनिश सॉन, हे सगळं कोणत्याही ठराविक शेड्यूलशिवाय, मनापासून.

नक्की वाचा >> देशासाठी घेतला सर्वात मोठा निर्णय! कोण आहे रिद्धिमा पाठक? गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतेय चर्चा

  • अन्नही स्थानिक आणि आरोग्यदायी असतं, जे घाईगडबडीत नव्हे तर निवांतपणे खाल्लं जातं.
  • एक जागतिक ‘सिस्टरहुड' (A Global Sisterhood)
  • येथे जगभरातील लेखिका, कलाकार, उद्योजिका, संस्थापक, प्राध्यापिका येतात.
  • पद, ओळख, प्रतिष्ठा हे सर्व मागे राहतं.
  • SuperShe Island हा रिसॉर्ट नाही; स्वतःला ऐकण्यासाठीची जागा आहे.
  • SuperShe Island दाखवतो की आजच्या धकाधकीच्या जगात स्त्रियांना केवळ ब्रेक नको, त्यांना शांततेचा हक्क हवा आहे.
  • आणि हे बेट त्याचं जबरदस्त उदाहरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com