Miss Grand Thailand 2026 Viral Video: सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नसून कठीण प्रसंगात तुम्ही स्वतःला कसे सावरता हे देखील पाहिलं जातं. थायलंडच्या एका मॉडेलसोबत स्पर्धेदरम्यान असंच काहीसं घडलं आणि तिने स्वत:ला सिद्ध देखील करून दाखवलं. मिस ग्रँड थायलंड 2026 (Miss Grand Thailand) च्या प्राथमिक फेरीत कोमोलवान चानागो (Kamolwan Chanago) हिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
नेमंक काय घडलं?
बुधवारी झालेल्या प्रिलिमिनरी राउंडमध्ये कोमोलवान चानागो, जी मिस ग्रँड पाथुम थानी म्हणून प्रतिनिधित्व करत आहे, स्टेजवर आपली ओळख करून देत होती. परिचय देत असतानाच तिचे नकली दात अचानक सैल होऊन तोंडाबाहेर आले. मात्र अशावेळी देखील तिने त्वरित हाताने दात पकडले, मागे वळली आणि ते व्यवस्थित बसवले. या सर्व प्रक्रियेत तिने एका सेकंदाचाही विलंब लावला नाही.
En un evento de belleza, Miss Tailandia sufrió un percance cuando se le cayó la dentadura postiza. pic.twitter.com/0o6URHkrcx
— Bandit Mapache (@banditmapache_) March 26, 2026
रॅम्प वॉक आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद
दात सावरल्यानंतर कोमोलवान पुन्हा प्रेक्षकांकडे वळली आणि हसतमुखाने आपला रॅम्प वॉक सुरू ठेवला. स्टेजच्या टोकावर पोहोचल्यानंतर तिने मुद्दाम काही सेकंद दात दाखवून पोज दिली, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास दिसून आला. तिची ही प्रसंगावधानता पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.
(नक्की वाचा- Central Government on Lockdown: देशात लॉकडाऊनच्या चर्चांदरम्यान केंद्राचं स्पष्टीकरण; सद्यस्थिती काय?)
मिस ग्रँड थायलंड 2026 ची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेती थायलंडचे प्रतिनिधित्व मिस ग्रँड इंटरनॅशनल 2026 मध्ये करणार आहे. जी स्पर्धा यंदा भारतात आयोजित केली जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world