जाहिरात

Video: 'या' ठिकाणी सोन्याची खाण कोसळली! भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो कामगार सैरावैरा पळाले

Today Trending Video : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिण भागातील एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत झालेल्या भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Video: 'या' ठिकाणी सोन्याची खाण कोसळली! भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, हजारो कामगार सैरावैरा पळाले
Congo Gold Mine Landslide
मुंबई:

Gold Mine Landslide Viral Video : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या दक्षिण भागातील एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत झालेल्या भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी दुपारी लुआलाबा प्रांतातील कोल्वेझी शहराजवळील मुलोंडो ल्वालाबा खाणीत झाला. या दरडीत 70 कामगार गाडले गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण शनिवारी मृतांचा आकडा जाहीर होताच अनेकांना धक्का बसला. जवळपास 101 जणांचा या भुस्खलनात मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय. अजूनही अनेक लोक जमिनीखाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्वेझी येथील ग्लोबल रिफ्युजीज लीडर्स फोरमचे प्रमुख पेकोस किलिहोशी यांनी डीपीएला (DPA) ला सांगितले की, गाडलेल्या आणि सापडलेल्या मृतदेहांमध्ये अनेक अंतर्गत विस्थापित व्यक्ती आहेत.डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या मोठ्या भागात सुरू असलेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर,दक्षिणेकडील संसाधनसमृद्ध प्रदेशात अनेक लोक आकर्षित होत आहेत.

नक्की वाचा >> Shocking News: अशक्य ते शक्य झालं! जन्माला येताच 'या' बाळाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद, डॉक्टरांनाही बसला धक्का

इथे पाहा सोन्याच्या खाणीचा भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ

जे अनियमित खाणींमध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी जातात आणि अनेकदा अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतात.देशातील खाण क्षेत्रांमध्ये वारंवार भूस्खलन होते.हे प्रामुख्याने मुसळधार पावसामुळे घडते आणि अस्थिर,अनियमित खाणींमुळे अधिक गंभीर होते.  जून महिन्यात रुबाया प्रदेशात झालेल्या भूस्खलनात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

नक्की वाचा >> New Cars In India : आता Creta चा खेळ खल्लास! मारुतीलाही देणार टक्कर, 'या' कंपनीच्या 2 कार मार्केट करणार जाम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com