Mumbai News : आयआयटीयन इतकी वर्षाची कमाई, मुंबईच्या प्लंबरचं Annual Income पाहून धक्काच बसेल!

Mumbai Plumber Salary: प्लंबरची कमाई पाहून आपणही प्लबिंगचं काम शिकलो असतो तर बरं झालं असतं अशी भावना निर्माण होईल इतकं नक्की.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबईच्या प्लंबरची सॅलरी
Social Media

Mumbai Plumber Salary: Reddit वर एक पोस्ट मोठी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मुंबईत एक प्लंबर वर्षाला साधारण १८ लाख रुपये कमावतो. हे पाहून अनेकांना धक्काच बसला. सध्या सोशल मीडियावर एका प्लंबरच्या पगाराची जोरदार चर्चा सुरू आहे. सहसा पांढरपेशी नोकऱ्या किंवा आयटी क्षेत्रातील पगाराबद्दल आपण ऐकतो, पण मुंबईतील एका प्लंबरचं उत्पन्न ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्लंबरची कमाई ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या...

रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने ही माहिती शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये सांगितल की, त्याच्या घरात काम करण्यासाठी आलेल्या एका प्लंबरची कमाई ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा प्लंबर दिवसाला साधारणपणे ५ ते ६ हजार रुपये कमावतो. या हिशोबाने त्याचे महिन्याचे उत्पन्न १.५ लाख रुपयांच्या घरात जाते आणि वार्षिक उत्पन्न तब्बल १८ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये हा रिक्षाचालक दिवसाला अडीच हजार म्हणजे महिन्याला तब्बल ७५ हजार रुपये कमवित असल्याचं समोर आलं होतं. हा प्लंबर मीरा रोड, बोरीवली आणि कांदीवलीच्या अनेक टाऊनशीपमधील प्लम्बिगचं काम सांभाळतो.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : मुंबईतील रिक्षाचालकाची कमाई पाहून BTech झालेल्या तरुणाला धक्का; म्हणाला इथंच येऊन...

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक पदवीधर तरुणांनी मिश्किलपणे म्हटलंय, आम्ही इतके शिक्षण घेऊनही एवढे कमावत नाही, त्यापेक्षा प्लंबिंगचे काम शिकलो असतो तर बरं झालं असतं. तर काहींनी म्हटलंय, मुंबईसारख्या शहरात तांत्रिक कामांची मोठी मागणी आहे आणि तिथे कष्टाला नक्कीच फळ मिळतं. हा प्लंबर कोणत्याही मोठ्या कंपनीत कामाला नसून तो स्वतंत्रपणे काम करतो. त्याच्याकडे कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि विश्वासार्हता असल्यामुळे त्याला सतत कामे मिळतात. विशेषतः मोठ्या सोसायट्या आणि कंत्राटदारांकडून त्याला मोठी कामे दिली जातात.

Topics mentioned in this article