Nagpur Couple London Video Viral : काही लोक करिअरची व्याख्या फक्त कॉर्पोरेट जॉब आणि मोठ्या पगारापुरती मर्यादित असल्याचं मानतात. पण एक आयआयटीएन मराठी कपल या विचारसरणीला अपवाद ठरलं आहे.भारतातील नामांकित संस्थांतून शिक्षण घेतल्यानंतर या कपलने लंडनमध्ये एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी पाणीपुरीसह सात कोर्सचा ‘देसी फ्यूजन' डिनर क्लब सुरू केलं. त्यानंतर त्यांच्या उद्योगाला कशाप्रकारे चालना मिळाली आणि सोशल मीडियावर चर्चा का रंगली? याबाबतची इनसाईड स्टोरी वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. ही स्टोरी फक्त अन्नाची नाही,तर ओळख,सामाजिक सलोखा आणि रिस्क घेण्याच्या धाडसाची आहे.
नागपूरमधील एका एनआरआय NRI महिलेने (VNIT) नागपूरमधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आणि नंतर आयआयटी (IIT) गुवाहाटीमधून मास्टर्स इन डिझाइन पूर्ण केले. भारतात त्यांनी सॅमसंग रिसर्च (Samsung Research) आणि बेंगळुरूमध्ये प्रोडक्ट डिझायनर म्हणून काम केले. लग्नानंतर 2024 मध्ये त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती उत्तर प्रदेशातील ओबरा येथील रहिवासी असून त्यांनी आयआयटी (IIT) धनबाद आणि आयआयआयटी (IIIT) हैदराबाद मधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे.कॉर्पोरेट ब्रेकदरम्यान लंडनमध्ये नवीन लोकांशी जोडले जाण्याची,एक आपलेपणा निर्माण करण्याची इच्छा यामुळे एका नवीन कल्पनेचा (The Bouzi Club) जन्म झाला.
नक्की वाचा >> भविष्यात मुंबई–पुणे 'एक्स्प्रेस वे'वर ट्रॅफिक जॅम होणार नाही? तज्ज्ञांचा सरकारला मोठा सल्ला, खासगी गाड्यांवर..
6 हजारांची डिनर प्लेट आणि सुरुवात पाणीपुरीपासून
द बौझी क्लब (The Bouzi Club) हा एक मंथली टिकटेड सपर क्लब आहे,ज्यात दर महिन्याला 10 ते 12 पाहुण्यांना आमंत्रित केले जाते.या ठिकाणी सात कोर्सचे इंडियन–फ्यूजन मील दिले जाते. ज्याची किंमत प्रति व्यक्ती £50(जवळपास 6000 रुपये)आहे.'पाणीपुरी'या क्लबची सर्वात मोठं वैशिष्ट्य..
महिला उद्योजक सांगतात की, “पहिले 10 मिनिटे खूप महत्त्वाची असतात. पाणीपुरी प्रत्येकाला बोलायला भाग पाडते कारण प्रत्येकाची स्वतःची एक अपेक्षा असते.हेच आमचे सर्वात शक्तिशाली आइसब्रेकिंग टूल बनले.आज पाणीपुरी प्रत्येक सुपर क्लबची सिग्नेचर सुरुवात आहे.”नव्या देशात होम-लेड फूड वेंचर सुरू करणे सोपे नव्हते.या दांपत्याकडे ना हॉस्पिटॅलिटीचा अनुभव होता,ना व्यवसायाची पार्श्वभूमी.
नक्की वाचा >> Rohit Shetty Residence Firing: गोळी सुटली आणि बॉलीवूड-अंडरवर्ल्डच्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली
अनुभव वाढत गेला अन् पुढे..
महिलांनी सांगितलं की,“प्राइसिंग आणि टिकटिंग स्वतः शिकावी लागली.स्थानिक लोकांच्या चवीप्रमाणे मसाल्यांचे संतुलन समजून घेणे ही मोठी कसरत होती.ऑपरेशन्समध्ये अनेकदा ट्रायल अँड एरर करावे लागले.पण आता अनुभव वाढल्याने सर्व काही खूप सोपे झाले आहे.”ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हे कपल फेस्टिव-थीम्ड डिनर्सही होस्ट करते.
द बौझी क्लब म्हणजे फक्त अन्न नव्हे; संवाद आणि आपलेपणाचा अनुभव
The Bouzi Club फक्त जेवण वाढत नाही,तर मोठ्या शहरात एकटेपणाशी झुंजणाऱ्या लोकांना संवाद,आपुलकी आणि समुदायाची भावना देतो. ही कहाणी दाखवते की यशाचा मार्ग एकच नसतं. कधी कधी पाणीपुरीसारखी साधी गोष्टही जग बदलण्याचं साधन बनू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world