जाहिरात

Rohit Shetty Residence Firing: गोळी सुटली आणि बॉलीवूड-अंडरवर्ल्डच्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर नुकत्याच झालेल्या गोळीबारामुळे अवघी चित्रपटसृष्टी हादरली आहे. या घटनेमुळे एकेकाळी बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डमधील कधी मधुर तर कधी कडवट संबंधांचे दिवस मुंबईकरांना पुन्हा आठवू लागले आहेत.

Rohit Shetty Residence Firing: गोळी सुटली आणि बॉलीवूड-अंडरवर्ल्डच्या संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली
Rohit Shetty Firing Case Latest Update
मुंबई:

Rohit Shetty Firing Case : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर नुकत्याच झालेल्या गोळीबारामुळे अवघी चित्रपटसृष्टी हादरली आहे. या घटनेमुळे एकेकाळी बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डमधील कधी मधुर तर कधी कडवट संबंधांचे दिवस मुंबईकरांना पुन्हा आठवू लागले आहेत. तो काळ असा होता जेव्हा बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्ड गँगस्टरनी दहशत निर्माण केली होती. तो काळ असा होता जेव्हा कलाकार गँगस्टरसोबत दिसायचे. त्या काळात गँगस्टर्स आणि बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमसंबंधांच्या सुरस कहाण्याही ऐकू यायच्या. अंडरवर्ल्ड डॉन आपल्या लाडक्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यासाठी निर्माते, दिग्दर्शकांना धमकवायचे. तो काळ असा होता जेव्हा बॉलीवूडसह संपूर्ण मुंबईत गँगस्टर्सची प्रचंड दहशत होती. जी दहशत मुंबई पोलिसांनी नंतर मोडून काढली.  

बिश्नोईने करवला रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. याच टोळीने काही दिवसांपूर्वी सलमान खानलाही अशाच प्रकारे धमकावले होते. बिश्नोई टोळीने सलमानला काळवीट शिकार प्रकरणावरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र या गँगचा खरा हेतू वेगळा आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा मुख्य उद्देश हा रोहित शेट्टी किंवा सलमान सारख्या बड्या मंडळींना टार्गेट करून  दहशत पसरवणे हा आहे. 90 च्या दशकात दाऊद किंवा छोटा राजन याच पद्धतीने आपली दहशत निर्माण करायचे.

खंडणी आणि खुनाचे सत्र

90 च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉनचा बॉलीवूडवर मोठा प्रभाव होता. हे गँगस्टर निर्मात्यांना फोन करून हप्ते मागायचे. ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला,त्यांना ठार मारायचे. कॅसेट किंग गुलशन कुमार यांची भररस्त्यात झालेली हत्या, निर्माते मुकेश दुग्गल यांचा खून आणि राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार या घटना आजही अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.त्या काळी पोलिसांचे खंडणी विरोधी पथक हे सर्वात सक्रीय पथक होते आणि त्यांच्या कामाचा व्यापही वाढला होता.

नक्की वाचा >> Rohit Shetty News: खळबळजनक! दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; 4 राऊंड फायर.. पोलीस अलर्ट

एकवेळ अशी आली होती जेव्हा बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांना चित्रपट निर्मितीसाठी अंडरवर्ल्डने पैसा देण्यास सुरूवात केली होती. मोठ्या कंपन्यांकडून पैसे मिळणे कठीण झाल्याने त्यांनी हा सोपा मात्र धोकादायक रस्ता निवडला होता. अंडरवर्ल्डनेही ही संधी ओळखत बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. अंडरवर्ल्डने आपला काळा पैसा चित्रपटांत गुंतवून तो पांढरा करण्यास सुरुवात केली. बदल्यात ते नफ्यातील मोठा हिस्सा आणि परदेशातील राईट्स आपल्या ताब्यात घ्यायचे. 'चोरी चोरी चुपके चुपके' हा चित्रपट याचे ढळढळीत उदाहरण होतं. पोलिसांना याचा सुगावा लागला होता, ज्यानंतर त्यांनी बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डमधील हे मधुर संबंध तोडून टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले होते.  

कलाकारांना अंडरवर्ल्डने आपल्या तालावर 'नाचवले'

90 च्या दशकात कलाकार आणि गुंडांचे एक अजब नातं तयार झालं होतं. दुबई किंवा शारजाहमध्ये अंडरवर्ल्डच्या पार्ट्या व्हायच्या आणि तिथे बॉलीवूडचे बडे स्टार्स दिसायचे. दाऊदच्या घरगुती कार्यक्रमांत नाचण्यासाठी अनेक कलाकारांना मोठी रक्कम देऊन बोलावले जायचे. काही कलाकार सुरक्षेसाठी स्वतःहून तिथे जायचे, तर काही जण दहशतीपोटी तिथे हजेरी लावायचे. या पार्ट्यांमधील अनेक व्हिडिओ आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

नक्की वाचा >> लग्नात 'रहमान डकैत'ची एन्ट्री होताच पाहुण्यांच्या नजरा खिळल्या, 50 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला Video

बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डची 'प्रेम' कहाणी

पोलीस तपासात अनेकदा अभिनेत्री आणि गँगस्टर्सच्या प्रेमसंबंधांचेही प्रसंग उघडकीस आले  मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम, मोनिका बेदी आणि अबू सालेम यांच्या जोड्यातर जगजाहीर झाल्या होत्या.  एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले की, माधुरी दीक्षितने जेव्हा दुबईला येण्यास नकार दिला, तेव्हा तिला मारण्याचा प्लॅन आखला गेला होता. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने तिचा जीव वाचला. आज मुंबईतील अंडरवर्ल्ड जवळजवळ संपले असले तरी, रोहित शेट्टी आणि सलमान खान यांच्यासोबत घडलेल्या या ताज्या घटनांमुळे सिनेसृष्टीत पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 'तो' काळ परत येतोय की काय, अशी भीती बॉलीवूडकरांच्या मनात घर करू लागली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com