NEET UG Topper Aryan Gupta Success Story: नुकतेच नीट-यूजी परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पंजाबच्या आर्यन गुप्ताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. लुधियानाच्या आर्यन गुप्ताने ९९.९९९९ पर्सेंटाइल मिळवून अखिल भारतीय रँक (AIR) १ मिळवला आहे. आर्यनच्या या घवघवीत यशाने त्याच्या कुटुंबियांनी जल्लोष करत अभिनंदन केले. या यशाबद्दल बोलताना आर्ययने त्याची डॉक्टर होण्याच्या स्पप्नाची भावनिक स्टोरीही सांगितली.
आजीच्या मृत्यूचं दुःख, डॉक्टर होण्याचं स्वप्न..!
आपल्या यशाबद्दल आर्यन गुप्ता म्हणाला, "मी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून अखिल भारतीय रँक १ मिळवला आहे. माझे आई-वडील डॉक्टर आहेत. मी खूप मेहनत केली. मला झोपही येत नव्हती, मात्र निकालानंतर स्वप्नात असल्यासारखे वाटत आहे. मी तिसऱ्या इयत्तेत असताना माझ्या आजीचा कर्करोगाने मृत्यू झाला. तेव्हाच मी हा संकल्प केला की डॉक्टर व्हायचं. मला भविष्यात ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोग तज्ञ) व्हायचे आहे"
आर्यनने सांगितले की परीक्षेची तयारी करताना तो दररोज १६-१७ तास अभ्यास करायचा. कधीकधी तो इतका कठोर अभ्यास करायचा की त्याला झोपही लागायची नाही. तो म्हणाला की AIR-1 मिळवणे हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. संपूर्ण कुटुंब खूप आनंदित आहे. आर्यनला भविष्यात ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) व्हायचे आहे. यामागे एक कारण आहे. तो तिसऱ्या इयत्तेत असताना, त्याच्या आजीचे कर्करोगाने निधन झाले. तेव्हाच त्याने ठरवले की तो मोठा झाल्यावर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करेल.
तरुणांसाठी मोठा संदेश
NEET परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून आर्यन गुप्ताने आपला संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. तो म्हणाला की ही फक्त सुरुवात आहे आणि अजून बरेच काही करायचे आहे. कॉलेज निवडणे महत्त्वाचे आहे. NEET-UG ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र देताना, आर्यन गुप्ताने त्यांना त्यांच्या शिक्षकांचे ऐकण्याचा सल्ला दिला. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असतो. प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करा, आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
Airtel ग्राहकांना बसू शकतो मोठा झटका! आपोआप कापले जाऊ शकतात पैसे? काय आहे कारण?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world